Box Office Collection: ‘तू झूठी मैं मक्कार’ लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील, आठव्या दिवशी केला एवढा कोटींचा व्यवसाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tu jhoothi main makkaar

Box Office Collection: ‘तू झूठी मैं मक्कार’ लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील, आठव्या दिवशी केला एवढा कोटींचा व्यवसाय

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचा 'तू झुठी मैं मक्कार' शाहरुख खान स्टारर 'पठाण' नंतर 2023 चा दुसरा ब्लॉकबस्टर बनण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून रणबीर आणि श्रद्धा यांच्या नव्या जोडीचे पडद्यावर कौतुकही झाले आहे.

'प्यार का पंचनामा' फेम लव रंजन दिग्दर्शित, 'तू झुठी मैं मक्कार' बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड राखत आहे. दुसऱ्या वीकेंडला हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करेल अशी अपेक्षा आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी 'तू झुठी में मक्कार'ने किती कलेक्शन केले आहे ते जाणून घेऊया.

'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्येच 70 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्याचबरोबर 'तू झुठी में मक्कार'च्या आठव्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडेही आले आहेत. मात्र, 8व्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घसरण झाली आहे. रिपोर्टनुसार, रणबीर-श्रद्धाच्या चित्रपटाने बुधवारी म्हणजेच आठव्या दिवशी 5.60 कोटींची कमाई केली आहे.

यासह, 'तू झुठी मैं मक्कार'चे एकूण कलेक्शन आता 87.91 कोटी रुपये झाले आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता, या वीकेंडपर्यंत हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल असे दिसते, यासह हा चित्रपट 'पठाण' नंतर बॉक्स ऑफिसवर शतक ठोकणारा 2023 मधील दुसरा बॉलिवूड चित्रपट ठरणार आहे.

8 मार्च 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'तू झुठी मैं मक्कार' मध्ये रणबीर आणि श्रद्धा व्यतिरिक्त डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर देखील मुख्य भूमिकेत आहेत. स्टँडअप कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. चित्रपटाची कथा रणबीर आणि श्रद्धा यांच्याभोवती फिरते.

टॅग्स :Ranbir Kapoor