
'मावशी जोमात सगळे कोमात' मावशी आणि वल्लीचा हा सदाशिव पेठी व्हिडिओ बघाच..
Tu tevha tashi : झी मराठीवरील (zee marathi) 'तू तेव्हा तशी' या मालिकेतील वल्ली आणि माई मावशी सध्या सर्वात ट्रेंडिंग आहेत. म्हणजे सौरभ आणि अनामिक हे मालिकेचे नायक असले तरी वल्ली आणि माई मावशीवरही लोक तितकंच प्रेम करतात, किंबहुना या दोघींचा वाद पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. पुण्यातल्या एका वाड्यात राहणाऱ्या या दोघी भांडतानाही प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. पण जितकं स्क्रीनवर या दोघींचं वाकडं आहे तितकच खऱ्या आयुष्यात त्यांची एकमेकींशी मस्त गट्टी आहे. सध्या या जोडीने एक भन्नाट व्हिडीओ समोर आणला आहे. याला अस्सल सदाशिव पेठी व्हिडीओ म्हणता येईल...
हेही वाचा: 'कान्सला जाण्याची तयारी करतेय..' हेमांगी कवीचा कहर व्हिडीओ..
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे वल्लीची भूमिका साकारत आहे. ती सेटवरील मजा-मस्ती व्हिडिओजच्या रूपात आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. वल्ली आणि माई मावशीचा असाच एक भन्नाट व्हिडीओ झी मराठीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अक्षरशः हसू आवरत नाही, त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
“ मावशी.. आपल्या समोरच्या चाळीचा मालक कोमात गेला हो.” असं अभिज्ञा म्हणजेच वल्ली माई मावशींना म्हणते. त्यावर मावशी मिश्कीलपणे म्हणतात, “बाई.. श्रीमंत माणसं ती.. मनाला येईल तिथे जातात.” हा भन्नाट व्हिडीओ सध्या व्हरयल होत आहे. याला स्थळ सदाशिव पेठ असं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे हा सदाशिव पेठी व्हिडीओ चांगलाच गाजतो आहे. ‘मावशी जोमात..बाकी सगळे कोमात!’ असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.
Web Title: Tu Tevha Tashi Valli And Mai Mavshi Funny Video Shared By Abhidnya Bhave
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..