'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील हिरो राणादा बनणार चोर!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 June 2019

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील 'चालतंय की' हा राणादाचा डायलॉग महाराष्ट्रभर प्रसिध्द झाला आहे. पण आता हा पहिलवान गडी राणादा मालिकेत दिसणार नाही.

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील 'चालतंय की' हा राणादाचा डायलॉग महाराष्ट्रभर प्रसिध्द झाला आहे. या डायलॉगमुळेही राणादाला बरीच प्रसिध्दी मिळाली. पण आता हा पहिलवान गडी राणादा मालिकेत दिसणार नाही. होय, तर राणादा आता राणादा राहीलेला नसून तो चोराच्या भूमिकेत मालिकेतून प्रेक्षकांसमोर येईल!

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत राणादाचा मृत्यू होणार असल्याचे म्हटले जात होते. या मालिकेच्या सेटवरील काही फोटो व्हायरल झाल्याने सुध्दा अशा चर्चा सुरु होत्या. आता खुद्द राणादा उर्फ हार्दिक जोशीने याचा खुलासा त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत केला आहे. 

या व्हिडीओत हार्दिक हटके आणि रावडी लूकमध्ये दिसत आहे. मारामारी करणारा, पाकिट मारणारा हार्दिक चोराच्या भूमिकेत दिसत आहे. आर आर उर्फ राजा राजगोंडा या पाकिटमाराची भूमिका आता राणादा 'तुझ्यात जीव रंगाला'मध्ये साकारणार आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

राजा राजगोंडा! R R!

A post shared by Hardeek Joshi (@hardeek_joshi) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tujhyat jeev rangala fem hardik joshi reentry in serial