मुंबई : हिंदी प्रमाणेच आता मराठी मालिकांमध्येही अनेक प्रयोग होऊ लागले आहेत. मराठी मालिकांमधूनही विविध विषय हाताळले जात आहेत. झी मराठी वाहिनीवरही अनेक नव्या अशा मालिका सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' ही मालिका संपली. कमी वेळातच या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला.

लोकांनी या मालिकेला आणि त्यातील व्यक्तीरेखांना पसंत केले. या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली इशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार. मलिका संपली आता ही अभिनेत्री करते तरी काय हे जाणून घ्या !
तुला पाहते रे मालिकेमधली विक्रांत आणि इशा ही जोडी लोकप्रिय झाली. प्रेम हे खरचं आंधळ असतं आणि त्याला वयेचीही मर्यादा नसते हे या जोडीने दाखवून दिलं. मालिकेतून गायत्रीने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. या मालिकेने घराघरात तिला लोकप्रियता मिळाली. या मालिकेने तर प्रेक्षकांचा निरोप घेतला पण, गायत्री आता काय करते याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.
गायत्री एका वेगळ्याच रुपातून प्रेक्षकांसमोर आली आहे. 'झी युवा' या वाहिनीवर नुकत्याच सुरु झालेल्या 'युवा डान्सिंग क्विन' मध्ये गायत्रीने एन्ट्री केली आहे. हा सेलिब्रिटी डान्सिंग रिअॅलिटी शो आहे.
11 डिसेंबरला या शोला सुरुवात झाली असून बुधवार ते शुक्रवार रोज रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतो.या शोमधून गायत्री तिचे वेगवेगळे नृत्याविष्कार सादर करताना दिसत आहे.
या शोविषयी बोलताना गायत्री म्हणाली, ' प्रेक्षकांनी मला इशाच्या भूमिकेत पाहिलं आहे. अतिशय साधी, सरळ आणि गोड मुलगी अशा व्यक्तीरेखेत मी इशाची भूमिका साकारली. पण, या शोमधून मी अतीशय वेगळ्या रुपात भेटणार आहे. स्टर्न, फोक, क्लासिकल आणि अजून वेगवगेळ्या डान्सफॉर्म सादर करणार आहे.'
या डान्स शोचं परिक्षण नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कथ्थक नर्तक, मयूर वैद्य करत आहेत.