Tunisha Sharma: मृत्यूच्या ११ मिनिट आधी तुनिषा शर्मा टिंडरवर.. नवा प्रियकर की? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tunisha dated man she met on Tinder, spoke to him before death

Tunisha Sharma: मृत्यूच्या ११ मिनिट आधी तुनिषा शर्मा टिंडरवर.. नवा प्रियकर की?

Tunisha Sharma suicide case: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 नोव्हेंबर रोजी, बाबा: दास्तान-ए-काबुल' शोच्या सेटवर आत्महत्या करून मृत्यूला कवटाळले. अभिनेत्रीने शोच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. सध्या या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून तिचा प्रियकर शिझान पोलिसांच्या ताब्यात आहे.

(Tunisha dated man she met on Tinder, spoke to him before death)

हेही वाचा: Akshay Kelkar: काहीना मी आवडलो नाही, मला माफ करा! बिग बॉस मराठी विजेता अक्षय केळकरची भावूक पोस्ट

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येच्या प्रकरणात आता रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणी तिचा सहकलाकार शीझान खानला अटक करण्यात आली आहे. आता शीझानच्या वकिलाने एक नवीन मुद्दा समोर आणला आहे.

हेही वाचा: Hrithik Roshan Birthday: फिटनेस फ्रिक हृतिक रोशनचा संपूर्ण डाएट खास तुमच्यासाठी, हा आहे सीक्रेट फंडा..

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शीझान खानचा जामीन अर्ज 11 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे, म्हणजेच बुधवारी शीझानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र, शीजनच्या जामिनावरील सुनावणीदरम्यान मोठा खुलासा झाला आहे. आरोपीचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी कोर्टात सांगितले की, 24 डिसेंबरला शीजानने तुनिशाला मेकअप रूममध्ये एकटी सोडली होती. यानंतर तुनिषाने तिच्या मृत्यूच्या १५ मिनिटे आधी 'अली' नावाच्या व्यक्तीशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती वकिलाच्या या खुलाशानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.

शीझान खानच्या वकिलाने कोर्टात खुलासा केला की, शीझानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तुनिशा, अली नावाच्या व्यक्तीला डेटिंग अॅप टिंडरच्या माध्यमातून भेटली होती. तुनिषा अलीसोबत डेटवरही गेली होती. मृत्यूच्या १५ मिनिटे आधी ती अलीशी व्हिडिओ कॉलवर बोलली. त्यामुळेच शीझान नाही तर अली 21 ते 24 डिसेंबर दरम्यान तुनिषाच्या संपर्कात होता.

त्याचबरोबर तुनिषा शर्माच्या वकिलानेही या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तुनिषाच्या वकिलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वकील विचारत आहेत की, शीजान मेकअप रूममधून बाहेर गेला होता, तेव्हा तुनिशा अलीशी बोलली हे त्याला कसे कळले? ती मेलेली असताना. एवढेच नाही तर तुनिषाच्या वकिलाने असेही सांगितले की, आम्हाला वाटते की हा 302 चा खटला आहे.