Judement : आई आणि मुलीची भावनिक 'सोबत’; 'तुझ्या सोबतीला' गाणं प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मे 2019

'जजमेंट' हा चित्रपट येत्या 24 मे ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील 'तुझ्या सोबतीला' हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शन निर्मित 'जजमेंट' हा चित्रपट येत्या 24 मे ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील 'तुझ्या सोबतीला' हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

आई आणि मुलीच्या अनमोल नात्यावर भाष्य करणारे 'तुझ्या सोबतीला' हे गाणं आंतराष्ट्रीय मातृदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आलं आहे. कितीही दाट अंधार असला तरी आशेचा किरण उगवणारच, असा संदेश गाण्यातून मिळत आहे. तर गाण्याच्या उत्तरार्धात मुलगी आईला हळवी साद घालून, तिचे प्रेम हे किती अमूल्य आणि न विसरता येणारे आहे हे सांगत आहे.

या गाण्याला आनंदी जोशी हिने स्वरबद्ध केले असून, नवल शास्त्री यांनी संगीतबद्ध केले आहे.

या चित्रपटात 'श्री पार्टनर' फेम श्वेता पगार हिचीसुद्धा महत्वाची भूमिका आहे. सोबत सतीश सलागरे, किशोरी अंबिये, महेंद्र तेरेदेसाई, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा भुजबळ आणि नुमायारा खान आदी कलाकार आहेत. निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' कादंबरीवर आधारित आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित, डॉ. प्रल्हाद खंदारे निर्मित आणि हर्षमोहन कृष्णात्रेय सहनिर्मित 'जजमेंट' या चित्रपटात प्रेक्षकांना भरभरून थरार अनुभवायला मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tuzya Sobtila song from the movie Judgment is released