esakal | 'त्यांना समिक्षक म्हणता येईल का?'; भाईजानची पाठराखण करत आकांक्षा पुरीचं KRK वर टीकास्त्र
sakal

बोलून बातमी शोधा

भाईजानची पाठराखण करत आकांक्षा पुरीचं KRK वर टीकास्त्र

भाईजानची पाठराखण करत आकांक्षा पुरीचं KRK वर टीकास्त्र

sakal_logo
By
शर्वरी जोशी

'ईद'च्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या (Salman Khan) 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' (Radhe : Your Most Wanted Bhai) या चित्रपटाला प्रेक्षक व समिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. यामध्येच कमाल आर खानने (Kamal R Khan) त्याच्या रिव्ह्यूमध्ये 'राधे'वर टीका केली होती. इतकंच नाही तर त्याने सलमानवरही वैयक्तिक टीका केली होती. त्यानंतर सलमानने केआरकेवर मानहानीचा दावा केला आहे. त्यातच आता छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आकांक्षा पुरीने सलमानची पाठराखण करत केआरकेवर टीकास्त्र डागलं आहे. (tv-actress-akanksha-puri-slams-krk-for-his-comments-on-salman-khan)

आकांक्षाने ट्विट करत केआरकेला खडे बोल सुनावले आहेत. सोबतच लोकप्रिय गायक मिका सिंग याचंही कौतुक केलं आहे. "सलमान खानच्या 'राधे' चित्रपटाविषयी diplomatic न होता व्यक्त झाल्यामुळे मिका सिंग तुमचे मनापासून आभार. प्रत्येक समिक्षकाला चांगला किंवा वाईट रिव्ह्यू देण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. मात्र, कोणावरही वैयक्तिक टीका करणं योग्य नाही. आपण खरंच त्यांना समिक्षक म्हणू शकतो का?," असं ट्विट आकांक्षाने केलं आहे.

केआरकेने 'राधे' चित्रपटावर टीका केल्यानंतर मिका सिंगने एक व्हिडीओ शेअर करत सलमानला पाठिंबा दिला होता. "सलमान खानने इतका उशीरा निर्णय घेतला त्यामुळे मी खरंच त्यांच्यावर नाराज आहे. तुम्ही चित्रपटाविषयी नक्कीच व्यक्त व्हा. परंतु, एखाद्यावर वैयक्तिक टीका करणं चूक आहे. तो माझा शेजारी आहे. जेथे माझा स्टुडिओ आहे, तिथेच बाजूला हा राहतो. जर माझ्याविषयी कधी काही चुकीचं बोलला तर मी केस वगैरे नाही. थेट मारामारीपर्यंत उतरेन", असं मिकाने त्याच्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, 'राधे' या चित्रपटाचं दिग्दर्शक प्रभूदेवाने केलं असून यामध्ये दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

loading image
go to top