esakal | 'सेलिब्रेटींनो, व्हॅक्सिन घेतलयं, मग सेंटरचं नाव का सांगत नाही?'

बोलून बातमी शोधा

tv actress nia sharma
'सेलिब्रेटींनो, व्हॅक्सिन घेतलंय, मग सेंटरचं नाव का सांगत नाही?'
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉ़लीवूडमध्ये कोरोनाचा कहर गेल्या काही दिवसांपासून वाढतो आहे. अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागणही झाली आहे. अशावेळी त्या सेलिब्रेटींनी कोरोनाच्या काळात चाहत्यांनी काय काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली आहे. दुसरीकडे चाहत्यांना घरात राहण्याचे आवाहनही केले आहे. गेल्या एक दोन महिन्यांपासून वेगवेगळे सेलिब्रेटी सोशल मीडियावर व्हॅक्सिन घेतल्याचे फोटो शेअर करत आहेत. त्याला त्यांच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळतो आहे. मात्र त्या फोटोंवर अभिनेत्री आणि मॉडेल निया शर्मानं आक्षेप घेतला आहे.

निया ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा फॅनफॉलोअर्सही मोठा आहे. ती वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेअर करुन नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आताही ती चर्चेत आली आहे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे तिनं जे सेलिब्रेटी कोरोनाची व्हॅक्सिन घेत आहेत त्यांच्यावर नियानं टीका केली आहे. सोशल मीडियावर तिची त्या टीकेसंदर्भातील पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यावरुन तिला अनेकांचा पाठींबाही मिळाला आहे. तर दुसरीकडे ती ट्रोलही झाली आहे.

नियानं आपल्या व्टिटमध्ये म्हटलं की, ज्या सेलिब्रेटींनी कोरोनाचं व्हॅक्सिन घेण्याचा सल्ला दिलायं त्यांनी ते व्हॅक्सिन कुठं घेतलयं हेही सांगावं. जर तुम्ही त्या केंद्राचे नाव सांगत नसाल तर मग उगाचच काहीही सल्ले देऊ नका. त्यामुळे लोकांना जास्त काळ व्हॅक्सिन घेण्याच्या रांगेत थांबावे लागणार नाही. नियाची ही प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. तिच्या अशाप्रकारच्या परखडपणाचे अनेकांनी कौतूकही केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडच्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी व्हॅक्सिन घेतानाचे फोटो शेअर केले होते.

निया म्हणाली, देशातले अनेक जागरुक सेलिब्रेटी सध्याच्या काळात नागरिकांना व्हॅक्सिन घेण्यासाठी आवाहन करत आहे. अशावेळी त्यांनी ज्या केंद्रावर व्हॅक्सिन घेतलं त्याचे नाव सांगावे असे मला वाटते. जेणेकरुन एकाच केंद्रावर होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल.