Kapil Sharma: 'मुलं गुलाबी रंगाचे कपडे घालू शकतात का?'

टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या वेगवेगळ्या स्टाईल आणि वक्तव्यासाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी म्हणून कपिल शर्माचे नाव घ्यावे लागेल.
The Kapil Sharma Show
The Kapil Sharma Show sakal

Kapil Sharma Pink Outfit- टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या वेगवेगळ्या स्टाईल आणि वक्तव्यासाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी म्हणून कपिल शर्माचे नाव घ्यावे लागेल. कपिल हा सध्याच्या घडीला लोकप्रिय कलावंत आहे. छोट्या पडद्यावर (viral post) त्यानं आपल्या अभिनयानं आणि हजरजबाबीपणामुळे वेगळे स्थानही निर्माण केले आहे. त्याच्या शो मध्ये येणाऱ्या दिग्गज सेलिब्रेटींना प्रश्न विचारुन भंडावून (The Kapil sharma Show) सोडण्यात कपिलचा हात कुणीही धरु शकत नाही. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या शोचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे.

सध्या कपिल एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्यात त्यानं इंस्टावरुन एक फोटो शेयर केला आहे. त्या फोटोमध्ये त्यानं पिंक रंगाचे टी शर्ट परिधान केले आहे. कपिलचा तो लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या फोटोला कपिलनं आपल्या नेहमीच्या शैलीत एक गंमतीशीर कॅप्शन दिलं आहे. ते वाचल्यावर अनेकांनी त्याला बोल लावले आहेत. कित्येकांनी त्याचं कौतूकही केलं आहे. गुलाबी रंगाच्या वेगळ्या ढंगात दिसणाऱ्या कपिलचा तो अंदाज नेटकऱ्यांना भलताच भावला आहे. त्यांनी त्या फोटोवर त्याला वेगवेगळ्या कमेंटसदेखील दिल्या आहेत. कपिलनं फोटोला कॅप्शन देताना लिहिलं आहे की, मी आताच गुगल केलं आणि त्यांना विचारलं की, मुलं गुलाबी रंगाचे कपडे घालू शकतात का..

The Kapil Sharma Show
House Of Dragons: जगप्रसिद्ध 'गेम ऑफ थ्रोन्स' लिहिणारा 'मार्टिन' आहे कोण?

कपिल म्हणतो, मला उत्तर मिळाले की, हो तुम्ही पिंक रंगाचे कपडे परिधान करु शकता. गुलाबी रंग हा एक मर्दानी रंग आहे. त्यातून आपल्याला शांतता जाणवते. अनेकांच्या मते गुलाबी रंग हा काही स्त्रीयांसाठी प्रतिकात्मकरीत्या वापरला जाणारा रंग नव्हता. कालांतरानं त्याला तसा अर्थ प्राप्त झाला. हे आपण लक्षात घ्यायला हवे. अठराव्या शतकात तर पुरुष देखील गुलाबी रंगाचे कपडे परिधान करत होते. तेव्हा काही त्यांच्या पौरुषात कोणताही फरक पडलेला नाही. त्यावर एका युझर्सनं कपिलचं कौतूक केलं आहे. कपिल पाजी तुस्सी ग्रेट हो. अशा शब्दांत त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

The Kapil Sharma Show
House of the Dragon Review: 'गेम ऑफ थ्रोन्स' शेर तर 'हाऊस ऑफ ड्रॅगन....'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com