Mandana Karimi: सलवार कुर्ताच घाल! सासू सासऱ्यांची सक्ती, नवरा तर...|tv entertainment Lock up Mandana Karimi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mandana karimi

Mandana Karimi: सलवार कुर्ताच घाल! सासू सासऱ्यांची सक्ती, नवरा तर...

Lock upp: बिग बॉसनंतर आता कंगनाचा लॉक अप शो हा मोठ्या प्रमाणात चर्चेत (Kangana Ranaut) आला आहे. त्यामध्ये सहभागी जे स्पर्धक झाले आहेत ते मनोरंजन क्षेत्रातील सर्वात वादग्रस्त असलेले सेलिब्रेटी आहेत. कंगनानं अशा (bollywood Actress) स्पर्धकांना कार्यक्रमातील लॉक अपमध्ये ठेवून त्यांना बोलतं केलं आहे. सध्या सोशल मीडियावर (Viral News) मोठ्या प्रमाणात कंगनाच्या लॉक अपनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे, तेहसीन पुनावाला, पुनम पांडे, सायशा शिंदे सारख्या स्पर्धकांच्या वादग्रस्त विधानांनी नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे. आता बिग बॉसची स्पर्धक मंदाना करिमी ही कंगनाच्या लॉक अपमध्ये बंदिस्त आहे. तिनं केलेल्या खुलाशानं चाहत्यांना धक्का बसला आहे.

मंदानानं कंगनाच्या या शोमध्ये वाईल्ड कार्डमधून एंट्री घेतली आहे. बाकीच्या स्पर्धकांच्या तुलनेत मंदानाचा प्रभाव कमी दिसत असला तरी तिनं केलेल्या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. काही करुन आपल्याला या शो मध्ये स्थान टिकवून ठेवण्याचे तिच्यासमोर आव्हान असताना तिनं केलेली वक्तव्ये आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. काही दिवसांपूर्वी मंदानानं अली मर्चंटवर लॉकअपच्या बाथरुमध्ये गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यावरुन कंगना तर अलीवर भयंकर संतापली होती. मंदानानं आता असं वक्तव्य केलं आहे की, आपल्याला सासु सासऱ्यांकडून मानसिक त्रास होत होता. त्यांनी आपल्या राहणीमानावर बंधनं आणली होती.

हेही वाचा: Lock Upp: 'आता तू रडणार'! कंगनाचा करण जोहरला इशारा: सांगितलं कारण

या शो मध्ये मंदानानं आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीवर देखील आरोप केले आहेत. ते धक्कादायक आहेत. मंदाना म्हणते, मी वयाच्या 27 व्या वर्षी लग्न केले. मात्र ते लग्न फार काळ टिकले नाही. आमचा प्रेमविवाह होता. दीड वर्षांपासून आम्ही एकमेकांना डेटही केले होते. त्यानंतर लग्न केले. सततचा वाद, भांडणं यामुळे संमतीनं वेगळं होण्याचा निर्णयही घेतला होता. माझा पती हा कायमच माझ्यावर संशय घ्यायचा. आमच्यात काहीच संवाद नव्हता. तर सासरच्याकडून अनेक गोष्टीत सक्ती केली जायची. त्यामध्ये मी नेहमी सलवार कुर्ता परिधान करुनच घरात वावरले पाहिजे. अशी त्यांची ताकीद असायची. मला घराच्या बाहेर पडण्याची देखील परवानगी नव्हती. असं मंदानानं यावेळी सांगितलं.

हेही वाचा: RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

Web Title: Tv Entertainment Lock Up Mandana Karimi Share Secret Ex Husband Gaurav Gupta

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top