Big Boss 16: Big Boss 16 मध्ये पुन्हा 'MeToo' ! अर्चना गौतम आणि सौंदर्या शर्मा यांची तूफान फटकेबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

big boss 16

Big Boss 16: Big Boss 16 मध्ये पुन्हा 'MeToo' ! अर्चना गौतम आणि सौंदर्या शर्मा यांची तूफान फटकेबाजी

बिग बॉस16 शोमध्ये दिवसेंदिवस रगंत येत आहे. त्यातच घरात दोन गटही तयार झाले आहे. अर्चना गौतम आणि सौंदर्या शर्माची गट्टी तर सर्वांच माहित आहे. त्यादोघी सोबत आल्या की कुणाचा तरी बॅंड वाजणार हे नक्कीच... यावेळी त्यांदोघी साजिद खानच्या मागे लागल्या आहेत.

साजिदच्या घरातील एंट्रीवर काही सदस्य सोडले तर सर्वांनाच आपत्ती होती. घरातच नाही तर बाहेरही त्याच्यामूळं चांगलच महाभारत घडलं होतं. #MeToo द्वारे त्यांचा कडाडून विरोध झाला आणि अजूनही होत आहे. अर्चना गौतम आणि सौंदर्या शर्मायांनी लाइव्ह फीड दरम्यान #MeToo परिस्थिती निर्माण केली. जी आता सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे मात्र बिग बॉसच्या शोमध्ये ती प्रसारित करण्यात आली नाही.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

या क्लिपमध्ये अर्चना गौतम एका बॉसची आणि सौंदर्या शर्मा नोकरीची गरज असलेल्या मुलीची भूमिका करतांना दिसत आहेत. सौंदर्या तिचा CV घेऊन येते आणि नोकरीची मागणी करते त्यावर अर्चना जी एका बॉसच्या भूमिकेत आहे ती विचित्र हावभाव आणि द्विअर्थाने तिच्याशी संवाद साधते. अर्चना बॉस म्हणून, तिला निर्दोष वागू नकोस असं सांगतांना दिसते आणि सौंदर्याने तिला कानशिलात मारल्याची ॲक्शन करते.

एका युजरने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन दिले आहे की, “या दोघीही महिला बेधडक आहेत, मी पुन्हा निर्भयपणे सांगतो!! मजबूत आणि FAADU. मला आशा आहे की तुम्हाला समजलचं असेल या दोघी कोणाला ट्रोल करत आहेत !! #साजिदखान !! मी हा व्हिडिओ reddit वर पाहिला!"

हेही वाचा: Big Boss 16: एमसी स्टॅनला शालीनसोबतचा वाद नडला; सलमाननं इज्जतच काढली ....

तर दुसर्‍या व्हिडिओमध्ये, सौंदर्या खोलीतून बाहेर पडते आणि नंतर परत येते आणि अर्चनाला 'ठरकी म्हातारा' म्हणते. #MeToo द्वारे आरोप करण्यात आलेल्या सोबत साजिद खानसोबत अर्चनाचं सतत भांडण होत असतं. त्यामुळेचं की काय अर्चना आणि सौंदर्या त्याच्यावर कुरघोडी करत होते का असा प्रश्न तयार होतो. हा व्हिडिओ मागील भागांचा आहे, जो टीव्हीवर प्रसारित करण्यात आला नाही मात्र सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.