Amitabh Bachchan: अमिताभ भावूक म्हणाले, "एकटेपणाची भावना..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan: अमिताभ भावूक म्हणाले, "एकटेपणाची भावना..."

टिव्हीवरील लोकप्रिय क्विझ शो कौन बनेगा करोडपती हा चाहत्याचा आवडीचा शो आहे कारण त्यातून मनोरंजन तर होतचं मात्र त्याचबरोबर ज्ञानात भरही पडते. मात्र यै शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच तुमचा आवडता शो KBC बंद होणार आहे. हो KBC सीझन 14 हा त्याच्या अंतिम टप्प्यात आहे. खूद्द शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी याबद्दल प्रेक्षकांना माहिती दिली आहे. बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये केबीसी बंद असल्याचं सांगितलंय.

KBC 14 बंद होणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये सांगितले की, केबीसीचे शूटिंग संपणार आहे. अशा स्थितीत अमिताभ हे भावूक झाले आहेत. शो ऑफ एअर व्हावा असं त्यांना नकोय. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये विविध व्यक्तिमत्त्व आणि सेलिब्रिटींपासून प्रेरित झाल्या बद्दल लिहिलं आहे.

हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

बिग बी लिहितात, "KBC मध्ये दिवस संपत आहेत आहेत.केबीसीच्या मंचावर विविध व्यक्तिमत्त्वाची लोक आली, ज्यांनी समाज आणि देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्या लोकांशी बोलणं हे सन्मानच होतं. त्याच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं, त्याची शैक्षणिक विचारसरणी आणि विचार, जे त्याने आपल्या विचाराने, विश्वासाने, शिस्तबद्धतेने आणि सर्वोत्तम शॉट देऊन साध्य केलेयं... हा सर्वांसाठी एक प्रेरणा आहे. निश्चितपणे माझ्यासाठी... आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन घरी परततो आणि स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करतो."

हेही वाचा: KBC 14 Juniors: "यांच्यासोबत खेळणे अशक्यचं"; बिग बी रागात हॉटसीटवरून उठले!

अमिताभ यांनी लिहिले की, "गुडबाय म्हणणं थोडं विचित्र आहे". केबीसी सीझन 14 संपल्याने बिग बी नाराज असल्याचे त्यांच्या या पोस्टवरून समजतयं. यामूळे ते भावूकही आहे." गूडबाय बोलण्याची भावना जाणवतेय पण पुन्हा लवकरच एकत्र असू" असं म्हणत त्यांनी शो ऑफ एअर होणार असल्याची माहिती दिली आहे."