दिवाळीत एकाच ड्रेसमध्ये दिसून आल्या श्वेता तिवारी आणि दिशा परमार, कोणाचा लूक जास्त आकर्षक?

दिपाली राणे-म्हात्रे
Monday, 16 November 2020

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि बिग बॉस १४ चा स्पर्धक राहुल वैद्यची गर्लफ्रेंड आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमारने त्यांचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

मुंबई- दिवाळाच्या खास निमित्ताने अनेकांना सजण्या धजण्याची हौस पूर्ण करता येते. दिवाळीत कित्येक सेलिब्रिटी सोशल मिडियावर त्यांचे सणासुदीचे  आणि पारंपारिक पोशाखातील फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा देत असतात. सारा अली खानपासून ते शाहीद कपूरपर्यंत बॉलीवूड सेलिब्रिटींचा दिवाळी लूक सोशल मिडियावर पाहायला मिळाला.

हे ही वाचा: कंगना रनौतने भावाच्या रिसेप्शनमध्ये पहाडी गाण्यांवर केला डान्स

टीव्ही जगतातील सेलिब्रिटी देखील त्यांचे पांरपरिक फोटो शेअर करताना दिसले. हिना खानपासून ते आमना शरिफपर्यंत टीव्ही जगतातील अभिनेत्रींनी त्यांचा अंदाज दाखवला. अशातंच अभिनेत्री श्वेता तिवारी आणि बिग बॉस १४ चा स्पर्धक राहुल वैद्यची गर्लफ्रेंड आणि टीव्ही अभिनेत्री दिशा परमारने त्यांचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

श्वेता तिवारीने दिवाळीच्या खास दिवशी फिक्या रंगाच्या शेडचा सूट परिधान करण्यासाठी निवडला ज्यामध्ये ती सुंदर दिसत होती. सोशल मिडियावर तिच्या लूकची चांगलीच चर्चा झाली. तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिच्या लूकची स्तुती केली. अनेकांनी कमेंट्स करत दिवाळीच्या शुभेच्छा देत तिच्या ड्रेसिंग निवडीची प्रशंसा केली. मात्र श्वेता तिवारीने एका गोष्टीत मार खाल्ला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by DP (@dishaparmar)

श्वेता तिवारी आणि दिशा परमार यांनी जो ड्रेस सूट परिधान केला होता तो अगदीच एकसारखा होता. म्हणजेच दोघींनी दिवाळीच्या खास दिवशी एकसारखाच सूट परिधान केला. अशातंच सोशल मिडियावर दोघांच्या लूकची तुलना करायला सुरुवात केली. काही जणांना श्वेता तिवारीचा लूक आवडला तर काहींनी दिशाच्या लूकची स्तुती करत हा ड्रेस तिच्यावर जास्त सूट होत असल्याचं म्हटलं. दोघींनी या खास दिवशी अंबरी कलेक्शनचा डिझायनर सूट दिवाळीसाठी निवडला होता.   

tv shweta tiwari and disha parmar wear same suit on diwali 2020 see pics  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tv shweta tiwari and disha parmar wear same suit on diwali 2020 see pics