Bigg Boss Marathi 4: यंदा दोन सदस्य जाणार घराबाहेर! बिग बॉसचा मोठा निर्णय..

यंदा एक नाही तर दोन सदस्य घराबाहेर, काय असेल बिग बॉसची नवी खेळी?
two contestant will eliminate in this week bigg boss marathi s 4
two contestant will eliminate in this week bigg boss marathi s 4 sakal
Updated on

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीचा खेळ सुरू होऊन आता 45 दिवस उलटले आहेत. रोज घरात नवीन राडा, नवे वाद होत आहेत. काल घरात कॅप्टनसी टास्क रंगला. यावेळी कॅप्टन होण्यासाठी स्पर्धकांनी वाटेल ते केले. कुणी कुणाचे केस कापले तर कुणी कुणाला मिरच्या खाऊ घातल्या. पण संचालक अक्षयच्या निर्णयाने कुणीच कॅप्टन होऊ शकले नाही. आता बिग बॉस च्या घरात वेधले लागले आहेत ते चावडीचे. कारण यंदाच्या चवडीत एक नाही तो दोन सदस्य घराबाहेर पडणार आहेत. नुकताच बिग बॉसने हा धक्कादायक खुलासा केला.
(two contestant will eliminate in this week bigg boss marathi s 4)

two contestant will eliminate in this week bigg boss marathi s 4
Chinmay Mandlekar: ह्यांना काय कळतं रे? म्हणत चिन्मय मांडलेकरने सांगितला ऐतिहासिक क्षण

यंदाच्या आठवड्यात सहा सदस्य घराबाहेर पडण्याच्यात प्रक्रियेत आहे. यामध्ये प्रसाद जवादे, किरण माने, तेजस्विनी लोणारी, यशश्री मसुरकर, अमृता धोंगडे, अमृता देशमु या स्पर्धकांचा समावेश आहे. या आठवड्यात सगळेच दमदारपणे खेळल्याने कोणघराबाहेर होणार ही सांगणे कठीण आहे. पण नियमाप्रमाणे शनिवारी चावडी आणि रविवारच्या चावडीला एक स्पर्धक घराबाहेर पडतो. पण यंदा स्पर्धकांना मोठा धक्का बसणार आहे. कारण यंदा एक नही तर दोन सदस्य घराबाहेर पडणार आहेत.

नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. 'बिग बॉसने एक मोठा निर्णय घेतला आहे. नॉमिनेटेड सदस्यांनी आपल्या घरावरील पाट्या घेऊन यायचं आहे, यातल्या दोन पाट्या या घरावर नसतील. म्हणजेच यंदा दोन सदस्य घराबाहेर होणार आहे.' असे या प्रोमोमध्ये सांगितले आहे. हा सर्वच स्पर्धकांसाठी मोठा धक्का आहे. आता खरच दोन सदस्य घराबाहेर होणार की यामागे बिग बॉसचा काही नवा डाव आहे, ही लवकरच कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com