बोनी कपूरच्या घरातील आणखीन दोन नोकर पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

सगळ्यांना घरीच राहा, सुरक्षित राहा असा सल्लाही देत आहेत.मात्र आता कोरोनाने सेलिब्रेटींच्याही घरी एन्ट्री केली आहे. त्यामुळे आता त्यांचीही तारांबळ उडाली आहे.यामध्ये आता बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्या घरापर्यंत कोरोना येऊन धडकला आहे.

मुंबई : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. मुंबई शहराचा आकडा दररोज वाढत आहे. रुग्णालयांतील संख्येतही वाढ होत आहे. सरकार आपल्या परीने या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.

डाॅक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी तसेच कामगार व पोलिस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. सर्वसामान्य माणसांसोबतच सेलिब्रिटीही आपापल्या घरी बसले आहेत आणि काही ना काही तरी उद्योग करीत आहेत. सोशल मीडियावर आपल्या विविध पोस्ट शेअर करीत आहेत.

सगळ्यांना घरीच राहा, सुरक्षित राहा असा सल्लाही देत आहेत. मात्र आता कोरोनाने सेलिब्रेटींच्याही घरी एन्ट्री केली आहे.  त्यामुळे आता त्यांचीही तारांबळ उडाली आहे. यामध्ये आता बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांच्या घरापर्यंत कोरोना येऊन धडकला आहे.

बोनी यांच्या घरातील नोकर साहू हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे बोनी कपूर त्यांच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्यासह कुटुंबात काम करणाऱ्या सर्वांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. बोनी कपूरच्या त्या नोकराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याला डाॅक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्यानंतर इतरांची तपासणी करण्यात आली आणि त्यातील दोन नोकरांची चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे.

केवळ दोन दिवसांमध्ये बोनी कपूरच्या घरातील तीन नोकर कोरोना पाॅझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे बोनी कपूर यांची चिंता आणखीन वाढली आहे. बोनी कपूरच्या मुली जान्हवी आणि खुशी सुरक्षित आहेत तसेच अन्य सदल्यही सुरक्षित आहेत. मात्र आता या तीन नोकरांवरती उपचार सुरू झाले आहेत. मात्र अन्य मंडळींना कोरंटाईन करण्यात आले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे आणि त्याचीच चर्चा सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two more members of Boney Kapoor’s domestic staff tested positive for coronavirus :