Unaad Review : तरुणाईला 'मार्गदर्शक' ठरेल अशी कलाकृती!

आता त्याने उनाड नावाचा मराठी चित्रपट आणलेला आहे. हा चित्रपट जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे.
Unaad Marathi Movie Review Released On Jio Cinema
Unaad Marathi Movie Review Released On Jio Cinema

Unaad Marathi Movie Review Released On Jio Cinema : सन २००५ मध्ये आलेल्या उलाढाल या मराठी चित्रपटापासून दिग्दर्शक आदित्य सरपोतदारची मराठीतील सुरू झालेली इनिंग आज मराठीबरोबरच हिंदीतही सुरू आहे. एक कल्पक दिग्दर्शक आणि चाकोरीबाहेरचा विचार करून चित्रपट बनविण्यात त्याचा चांगलाच हातखंडा आहे. त्याच्या झोंबिवली, फास्टर फेणे आदी चित्रपटावरून ते दिसून येते.

आता त्याने उनाड नावाचा मराठी चित्रपट आणलेला आहे. हा चित्रपट जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे. आजच्या तरुणाईला मार्गदर्शक ठरेल...त्यांना काही तरी प्रेरणा मिळेल असा हा चित्रपट आहे. कथेची उत्तम बांधणी, सोबतीला संगीताची सुरेल साथ आणि त्याचबरोबर नवोदित कलाकारांचा लाजबाब अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. या चित्रपटाची कथा कोळीवाड्यातील तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तीन मुलांभोवती फिरणारी आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

दापोलीतील-हर्णे येथे हे तीन तरुण राहात असतात. त्यातील एकाचे नाव शुभम (आशुतोष गायकवाड), दुसऱ्याचे नाव जमील (चिन्मय जाधव) आणि तिसऱ्याचे नाव बंड्या (अभिषेक भारते) असे असते. या तिन्ही तरुणांना काहीही कामधंदा नसल्यामुळे ते उनाडकी करीत असतात. शुभमचे वडील (देवेंद्र पेम) हे बोटीवर नाखवा म्हणून काम करीत असतात. जमीलची वडिलोपार्जित बेकरी असते.

जमीलने परदेशात जाऊन कामधंदा करावा अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा असते तर बंड्याला वडील नसतात. त्याची आई (देविका दफ्तरदार) मासेविक्री करून घर चालवीत असते. त्या तिघांच्याही घरची परिस्थिती तशी बेताचीच असते. परंतु त्यांना त्याचे काही देणे-घेणे नसते. ते तिघेही आपले आयुष्य मजेत जगत असतात. एके दिवशी पुण्यातून एक कुटुंब आंजर्ले या गावी स्थायिक होण्यासाठी येते. त्या कुटुंबाला किल्ला दाखविताना शुभमची ओळख स्वरा (हेमल इंगळे) या तरुणीशी होते. त्याच ओळखीचे रुपांतर त्यांच्या मैत्रीमध्ये होते.

Unaad Marathi Movie Review Released On Jio Cinema
Oppenheimer Review : अमेरिका जशी डोक्यावर घेते तशीच ती...! 'ओपनहायमर'ला बोटावर नाचवलं

स्वरा ही शहरात वाढली असल्यामुळे ती मोकळ्याढाकळ्या स्वभावाची तरुणी असते. तिला शुभमचा बिनधास्त व मनमोकळा स्वभाव आवडतो. परंतु एका क्षणाला शुभमकडून एक चूक घडते आणि त्यातूनच पुढे शुभमच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळते. मग शुभमच्या हातून कोणती चूक घडते...त्यानंतर बंड्या आणि जमीलचे काय होते..जीवनाचा वा जगण्याचा अर्थ न समजणाऱ्या या तिन्ही तरुणांच्या आयुष्यात कोणते बदल होत जातात आणि तो कसा होतो...स्वरा नेमका काय निर्णय घेते...याकरिता हा चित्रपट पाहावा लागेल.

दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुलांना मार्गदर्शन ठरेल...त्यांच्या पालकांनाही काही तरी बोध होईल असा चित्रपट बनविला आहे. मुले तरुण वयात येत असताना त्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. नाही तर त्यांचे जहाज समुद्रात भरकटायला वेळ लागणार नाही हेच सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

या चित्रपटात आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भारते, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार, संदेश जाधव आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत आणि त्यांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

तरुणाईचा विचार करण्याची पद्धत, त्यांच्यातील मैत्रीचे भावबंध, त्यांच्यातील अहंकार आणि अभिमान वगैरे बाबी आशुतोष, अभिषेक, हेमल, चिन्मय या कलाकारांनी पडद्यावर छान टिपल्या आहेत. या कलाकारांचे नक्कीच कौतुक करावे लागेल. संदेश जाधवने साकारलेली तांडेल ही व्यक्तिरेखा लक्षात राहणारी आहे.

अभिनेत्री देविका दफ्तरदारनेदेखील आपली भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटातील गाणी कथेच्या अनुषंगाने गुंफण्यात आली आहेत. कोकणातील नयनरम्य लोकेशन्स सिनेमॅटोग्राफर यांनी आपल्या कॅमेऱ्यात छान टिपली आहेत.

ही सगळी लोकेशन्स मनाला भुरळ घालणारी आहेत. चित्रपट सुरुवातीला मनाची फारशी पकड घेत नाही. परंतु त्यानंतर कथा छान वेग पकडते. एकूणच तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करणारा व आत्मपरीक्षण करायला लावणारा असा हा चित्रपट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com