Union Budget 2023: मनोरंजनाच्या वाट्याला भोपळा! अशोक पंडित चिडले, आमची काळजी कुणालाच नाही

ना तिकिटांची किंमत कमी, ना OTT स्वस्त.. इंडस्ट्रीकडे नेहमीच दुर्लक्ष
Union Budget 2023
 Filmmaker Ashoke Pandit
Union Budget 2023 Filmmaker Ashoke PanditEsakal

1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केला. या बजेटमध्ये चित्रपटाची तिकिटे आणि ओटीटी सबस्क्रिप्शनबाबत मनोरंजन उद्योगालाही काही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती, पण तसं काही झालं नसल्याने चित्रपटप्रेमींची नाराजी दिसत आहे.

Union Budget 2023
 Filmmaker Ashoke Pandit
Pathaan Box Office Collection Day 7: 'पठाण' ची घोडदौड सातव्या दिवशी मंदावली! मात्र तरीही कमावला इतक्या कोटींचा गल्ला...

याबाबत आता चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट इंडस्‍ट्रीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी भारत सरकारवर टिका आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बजेटबद्दल बोलताना चित्रपट निर्माते अशोक पंडित म्हणाले, 'आपली इंडस्‍ट्री देशातील सर्वात मोठा करदाता आहे. चित्रपट उद्योग दरवर्षी सर्वाधिक कर भरतो, पण आपल्या मनोरंजन उद्योगाकडे सर्वच सरकारांचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. हे दुर्दैव आहे.'

Union Budget 2023
 Filmmaker Ashoke Pandit
Malaika Arora copy Urfi: उर्फीचे कपडे भाड्याने घेतले की काय? मलायका ड्रेस पाहुन नेटकरी सुसाट

अर्थसंकल्पात इतर उद्योगांबद्दल ज्याप्रकारे बोलले गेले आहे, मग ते वस्त्रोद्योग असो, साबण उद्योग असो की आरोग्य उद्योग असो, मात्र इंडस्‍ट्रीबद्दल काहीही बोललं जातं नाही.'

फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन अध्यक्ष, अशोक पंडित पुढे म्हणतात, 'ज्या प्रकारे इतर उद्योग ओळखले जातात आणि त्यावर चर्चा केली जाते. त्या उद्योगाच्या फायद्यांचा विचार केला जातो. मात्र आमच्या मनोरंजन उद्योगाबद्दल कसं काहीच घडत नाही. हा उद्योग कसा वाचवायचा, कसा वाढवायचा, याचा कुणीच विचार करत नाही. कोव्हिड-19 महामारीच्या काळातही आम्ही घरात बसून लोकांचे मनोरंजन केले आहे.'

Union Budget 2023
 Filmmaker Ashoke Pandit
Aryan Khan: 'बापामुळे इतकी प्रसिद्धी नाहीतर', आर्यन खानचा अ‍ॅटिट्यूड पाहून नेटकऱ्यांनी काढली इज्जतच..

मिळालेल्या माहितीनुसार, सिंगल स्क्रीन थिएटर्स आणि मल्टिप्लेक्सच्या तिकीट दरात मोठी तफावत आहे. त्याचप्रमाणे, जर आपण OTT प्लॅटफॉर्मबद्दल बोललो, तर त्याचा सबस्क्रिप्शन दर देखील खूप जास्त आहे. हे जर कमी झाले तर जास्तीत जास्त लोक चित्रपटांकडे खेचले जातील आणि सर्वांना त्याचा फायदा होईल. मात्र, या अपेक्षाही अर्थसंकल्पाने नाराज केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com