esakal | नागराज मंजुळे यांच्या वाढदिवसाची अनोखी गोष्ट 
sakal

बोलून बातमी शोधा

नागराज मंजुळे यांच्या वाढदिवसाची अनोखी गोष्ट 

अभिनेते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा काल (ता.24) वाढदिवस होता. नागराज आणि त्यांचा छोटा भाऊ शेषराज पोपटराव मंजुळे यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. यासंबधी नागराज यांनी उलगडा केला आहे.

नागराज मंजुळे यांच्या वाढदिवसाची अनोखी गोष्ट 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अभिनेते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा काल (ता.24) वाढदिवस होता. नागराज आणि त्यांचा छोटा भाऊ शेषराज पोपटराव मंजुळे यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. यासंबधी नागराज यांनी उलगडा केला आहे.

नागराज यांनी एक फेसबुक पोस्ट लिहली आहे. त्यामध्ये त्यांनी तसे स्पष्ट केले आहे. यावर्षी पहिल्यांदाच वाढदिवस गावाकडे साजरा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले असून गावच्या मित्रांनी अनौपचारिक पद्धतीनं मात्र खूपच उत्साहात साजरा केला असल्याचे सांगितले आहे. त्या सर्वांचे नागराज मंजुळे यांनी फेसबुक पोस्ट लिहत आभार मानले आहेत.

दरम्यान, सबंध महाराष्ट्राला याड लावणारे दिग्दर्शक म्हणून नागराज यांची ओळख आहे. ‘सैराट’नंतर दिग्दर्शक म्हणून जातीपातीच्या पलीकडे जाऊन चित्रपट करणारा असं त्याचं कौतुक झालं. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1977 रोजी झाला. ते उत्तम कविताही करतात. त्यांच्या ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ या कवितासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला आहे.

loading image
go to top