esakal | नीना गुप्ता-विवियन रिचर्ड्स यांचा कधीही न पाहिलेला फोटो आला समोर
sakal

बोलून बातमी शोधा

neena gupta and vivian richards

नीना आणि विवियन यांचं रिलेशनशिप फार चर्चेत होतं. 

नीना गुप्ता-विवियन रिचर्ड्स यांचा कधीही न पाहिलेला फोटो आला समोर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि त्यांची मुलगी मसाबा गुप्ता या दोघींमध्ये मायलेकीबरोबरच मैत्रिणींचं नातं आहे. अनेकदा नीना आणि मसाबा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत एकमेकींबद्दलचं प्रेम व्यक्त करतात. नुकतंच मसाबाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास फोटो पोस्ट केला आहे. मसाबा ही नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजच्या संघातील माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. मसाबा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित फॅशन डिझायनरसुद्धा आहे. या मायलेकी विवियनसोबत राहत नाहीत. मात्र मसाबाने अनेकदा वडिलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आता तिने नीना आणि विवियन यांचा कधीही न पाहिलेला खास फोटो पोस्ट केला आहे. 'माझं जग, माझं रक्त' असं कॅप्शन देत तिने हा खूप जुना फोटो पोस्ट केला आहे. 

या फोटोमध्ये मसाबा खूप लहान असून ती नीना यांच्या मांडीवर ती झोपली आहे. या दोघी मायलेकींच्या बाजूलाच विवियन रिचर्ड्स बसले आहेत. नीना गुप्ता यांचा हा फोटो पाहून त्यांच्यात आतासुद्धा काहीच बदल झाला नाहीये, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. तर अनेकांनी खूप सुंदर कुटुंब असं म्हणत मसाबाचं कौतुक केलं आहे. 

हेही वाचा : 'हा तर लस घ्यायचा ड्रेस'; हटके फोटोशूटमुळे श्रुती मराठे ट्रोल

नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांचं रिलेशनशिप ८०च्या दशकात फार चर्चेत होतं. या दोघांनी लग्न केलं नाही. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. मसाबासाठी नीना आणि विवियन यांनी नेहमीच काही कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावली होती. मसाबा हे नाव सध्या फॅशन विश्वातील फार प्रसिद्ध नाव आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठमोठ्या कलाकारांसाठी ती फॅशन डिझायनिंग करत असून 'हाऊस ऑफ मसाबा' या नावाने तिचा स्वत:चा फॅशन ब्रँडसुद्धा आहे. 
 

loading image