Uorfi Javed : उर्फीचा मोर्चा आता सद्गुरुंकडे; म्हणाली, "छोटी सोच वाले..." | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed Slams Sadhguru)

Uorfi Javed : उर्फीचा मोर्चा आता सद्गुरुंकडे; म्हणाली, "छोटी सोच वाले..."

Uorfi Javed : उर्फी जावेद सध्या चांगलीच चर्चेत आहे. उर्फी जावेदच्या अनोख्या फॅशनवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती. यानंतर उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. हे प्रकरण सुरु असताना उर्फी जावेदने आता LGBTQ समुदायाबाबत केलेल्या वक्तव्यावरून अध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे उर्फी पुन्हा चर्चेत आली आहे. (Urfi Javed Slams Sadhguru)

उर्फी जावेद तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. दरम्यान उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरी मधून सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सद्गुरू LGBTQ समुदायाबद्दल त्यांचे विचार व्यक्त करत आहेत. यावर उर्फीने टीका केली आहे. 

हेही वाचा: Pune By-Elections: पुण्यात पोटनिवडणूकीसाठी भाजप पवारांच्या दारात, राष्ट्रवादी पंढरपूरचा बदला घेणार?

उर्फी म्हणाली, "जो कोणी या लीडरला फॉलो करत असेल त्यानी मला अनफॉलो करावे. (सद्गुरु जग्गी वासुदेव) त्यांच्या मते LGBTQ ही एक मोहीम आहे. कदाचित त्यांना हे वाटत असेल कारण काही लोक त्यांच्या लैंगिकतेच्या स्वातंत्र्यावर उघडपणे बोलू शकतात. LGBTQ समुदाय लहान नाही, परंतु मला वाटते की कदाचित त्यांची विचार लहान आहेत."

uorfi javed instagram story

uorfi javed instagram story

हेही वाचा: Fadnais on Satyajeet Tambe: "सत्यजीत तांबेंचं काम चांगलं, योग्यवेळी निर्णय घेऊ"; फडणवीसांनी तापवलं वातावरण

उर्फी म्हणाली, "अशा प्रकारच्या प्रचाराला प्रोत्साहन देऊ नये. LGBTQ समुदायाला आपल्या समर्थनाची गरज आहे. लोकांना त्यांची लैंगिकता लपविण्यास भाग पाडले जात आहे."

हेही वाचा: Shirdi Bus Accident : सुट्टी बेतली जीवावर! पहिल्यांदाच सहकुटुंब फिरायला गेले अन् लेकरं...