Upcoming bollywood Movies in 2024 : नव्या वर्षात कोणकोणते चित्रपट होणार प्रदर्शित? तारीख अन् नाव लिहून ठेवा!

खासकरुन गदर २, पठाण, जवान, रॉकी और रानी की प्रेम कहानी, अॅनिमल सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचे दिसून आले.
Bollywood Most Awaited Movies 2024
Bollywood Most Awaited Movies 2024
Updated on

Bollywood Most Awaited Movies 2024 : यंदाचं वर्ष बॉलीवूड चित्रपटांसाठी लाभदायी गेल्याचे दिसून आले. खासकरुन गदर २, पठाण, जवान, रॉकी और रानी की प्रेम कहानी, अॅनिमल सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचे दिसून आले. नव्या वर्षात देखील अनेक बिग बजेट आणि बिग सेलिब्रेटींचा समावेश असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ते कोणते याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

‘प्रोजेक्ट के’

नव्या वर्षाचा सर्वाधिक चर्चेतील चित्रपट म्हणून ज्याकडे पाहिले जात आहे त्या प्रोजेक्ट मध्ये अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट जानेवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे.

‘स्त्री 2’

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री चित्रपटानं प्रेक्षकांना घाबरुन सोडलं होतं. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसादही मिळाला होता. आता त्याचा दुसरा भागही पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राजकुमारनं याविषयी सोशल मीडियावर एक पोस्टही शेयर केली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये ही फिल्म प्रदर्शित होणार आहे.

‘फाइटर’

काही दिवसांपूर्वी ज्या चित्रपटाच्या पोस्टरनं प्रेक्षकांना भुरळ घातली होती त्या सिद्धार्थ आनंदच्या फायटरचा प्रेक्षकांना पुढील वर्षी जानेवारीमध्ये प्रेक्षकांना आनंद घेता येणार आहे. त्यामध्ये ऋतिक रोशन आणि दीपिका यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या त्याचा टीझर आणि फर्स्ट लूक समोर आला आहे.

‘लव सेक्स और धोखा 2’

प्रसिद्ध निर्माती एकता कपूरचा लव्ह सेक्स धोखा २ हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची रिलिज डेट १६ फेब्रुवारी २०२४ असल्याचे बोलले जात आहे. त्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांनी केले आहे.

‘मिस्टर एंड मिसेज माही’

प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांचा स्पोर्टस ड्रामा मिस्टर अँड मिसेस माही हा १५ मार्च २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे.

‘बड़े मियां छोटे मियां’

अली अब्बास जफर यांचे दिग्दर्शन असलेली बडे मिया छोटे मिया नवााची फिल्म देखील पुढील वर्षी २०२४ च्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वासू भगनानी द्वारा निर्मित या चित्रपटामध्ये खिलाडी अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांच्या भूमिका आहेत. याशिवाय त्यात मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन देखील त्यात दिसणार आहे.

‘द क्रू’

तब्बू, करिना कपूर, क्रिती सेनन आणि दिलजीत दोसांज यांच्या भूमिका असलेला द क्रू नावाचा चित्रपट २२ मार्च २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तीन महिलांची एक विलक्षण कहाणी या चित्रपटातून समोर येणार आहे. त्याचे दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केले आहे.

‘अमर सिंह चमकीला’

प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांची अमर सिंह चमकीला फिल्म पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात दिलजीत दोसांज आणि परिणीती चोप्रा यांच्या भूमिका आहेत.

‘मेरा महबूब मेरे सनम’

२३ फेब्रुवारी २०२४ मध्ये आनंद तिवारी दिग्दर्शित मेरे महबूब मेरे सनम हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. यात विक्की कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

‘सिंघम अगेन’

रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेली ही फिल्म गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या उत्सुकतेचा भाग आहे. या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. सिंघम आणि सिंघम रिटर्न्स यांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. २०२४ च्या ऑगस्ट महिन्यात ही फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com