Uorfi Javed Vs Chitra Wagh : उर्फी जावेदची चित्रा वाघ यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार; चाकणकर म्हणाल्या...

मुंबई पोलीस आयुक्तांना देणार महत्वाचे निर्देश
Chitra wagh vs Urfi Javed
Chitra wagh vs Urfi JavedEsakal

मुंबई : आपल्या तोकड्या कपड्यांमुळं सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद हिनं शुक्रवारी राज्य महिला आयोगाला भेट दिली. तसेच आपल्याला कथीत धमकी दिल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या तक्रारीची दखल घेतली असून मुंबई पोलिसांना याबाबत आवश्यक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. (Urfi Javed complaint against Chitra Wagh in State Commission for Women)

Chitra wagh vs Urfi Javed
Jumbo scam in BMC: मुंबई महापालिकेत 6000 कोटींचा जंबो घोटाळा! आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

याबाबत माहिती देताना चाकणकर म्हणाले, भारतीय संविधानानं तुम्हाला आम्हाला व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळं कोणी काय घालायचं? काय घालायचं नाही? हा अधिकार त्याला दिलेला आहे. त्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करु शकत नाही. त्यामुळं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

Chitra wagh vs Urfi Javed
Fadnais on Satyajeet Tambe: "सत्यजीत तांबेंचं काम चांगलं, योग्यवेळी निर्णय घेऊ"; फडणवीसांनी तापवलं वातावरण

महाराष्ट्रात अनेक मोठे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आयोग प्रयत्न करत आहे. आमच्या दृष्टीकोनातून या प्रश्नांवर वेळ घालवावा इतका तो महत्वाचा नाही. तरी सुद्धा उर्फी जावेद यांनी आयोगात येऊन भेट घेतली. यावेळी तिनं आपल्याला धमकी दिल्याची आणि त्यामुळं असुरक्षित वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यातून त्यांनी संरक्षण मिळावं अशी मागणी केली. तसेच भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचाः सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

दरम्यान, राज्य महिला आयोगाकडं आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल राज्य महिला आयोग घेत असतं. त्यानुसार उर्फी यांच्या तक्राराची नोंद घेण्यात आली असून पोलीस आयुक्तांकडं ती पाठवली जाईल, असंही यावेळी रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com