Urfi Javed Video: रस्त्यावर पडलेल्या सिगारेटच्या थोटक्यांचा वापर उर्फीनं कसा केला माहितीये?

Urfi Javed Video:
Urfi Javed Video:Esakal

Urfi Javed Video: आपल्या हटके आणि भन्नाट ड्रेसिंग सेन्समुळे कायम चर्चेत राहणारी उर्फी जावेद ही कधी काय फॅशन करेल याचा नेम नाही.

तिने नुकतीच एका वृत्त संस्थेला मुलाखत दिली होती त्यानंतर ती चर्चेत आली. उर्फी ही तिच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते तिने कधी सायकलची चैन तर कधी कंगवा अशा अनेक वस्तूंचा वापर करुन ड्रेस तयार केले आहेत.

आता मात्र उर्फीनं अशा वस्तूपासून ड्रेस तयार केला आहे की ते पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा डोक्याला हात लावला आहे.

आता उर्फीनं सिगारेटच्या थोटक्यांचा वापर करुन ड्रेस तयार केला आहे. तिने रस्त्यावरून ही एक एक करत ही थोटकं गोळा केली आहे. याचा वापर करत तिने आपला नवा ड्रेस तयार केला आहे. उर्फीच्या या नवीन ड्रेसचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

उर्फीनं याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की उर्फी रस्त्यावर सिगारेटच्या थोटकं गोळा करत आहे. यानंतर उर्फी ती एक-एक करून ही सर्व थोटकं तिच्या ड्रेसला जोडली आणि काही वेळातच तयार झाला तो उर्फी जावेदचा नवा ड्रेस

Urfi Javed Video:
Nusrat Bharucha Mother Reaction : 'ती सगळ्यात पहिल्यांदा....'! अभिनेत्री नुसरतच्या आईनं दिली मोठी प्रतिक्रिया

उर्फी जावेदने सिगारेटपासून ऑफ शोल्डर ड्रेस बनवला. उर्फी या ड्रेसमध्ये खुपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. तिने हा ड्रेस परिधान करुन वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

उर्फी जावेदने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'हा ड्रेस बनवल्यानंतर अनेक दिवस माझ्या हातांचा सिगारेटचा वास येत होता.'

Urfi Javed Video:
Jawan on OTT: हजार कोटींचा टप्पा पार केल्यानंतर किंग खानचा 'जवान' ओटीटीवर धडकणार! जाणून घ्या केव्हा आणि कुठे पहायचा

उर्फीचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यावर चाहत्यांनी खुप खूप कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे.

आत्तापर्यंत उर्फी जावेदने पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत अनेक गोष्टींनी बनवलेल्या ड्रेस बनवला आहे. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा बोल्डनेसची हद्द पार केली आहे.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com