मोटरबाईकचं सीट कव्हर काढून अंगावर घातलं बयेनं..आता गाडीचं काय करायचं...Urfi javed New Look | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed New Look

Urfi javed: मोटरबाईकचं सीट कव्हर काढून अंगावर घातलं बयेनं..आता गाडीचं काय करायचं..

Urfi Javed New Look: आपल्या अतरंगी कपड्यांमुळे ओळखली जाणारी उर्फी जावेद कॅमेऱ्यासमोर अंगप्रदर्शन करताना किंवा मनातलं बोलताना कधीच लाजत नाही..ती भलतीच बिनधास्त आहे.

नुकताच तिचा नवा लूक समोर आला आहे. उर्फी जावेद पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाली...अन् चर्चा सुरू झाली. यादरम्यान अभिनेत्रीनं मीडियाशी बोलताना बिग बॉस १६ संदर्भात बातचीत केली.

बोलता बोलता तिनं बिग बॉस १६ चा विनर एमसी स्टॅन संदर्भात असं काही वक्तव्य केलं की काही सेकंदातच ते व्हायरल झालं.

उर्फीनं आपल्या वक्तव्यात म्हटलं की तिला एमसी स्टॅन खूप आवडतो. आणि तिचं त्याच्यावर प्रेम आहे. यावेळी एमसी स्टॅनच्या गाण्यावर तिनं भन्नाट डान्सही केला.

आपल्या या वक्तव्यासोबतच उर्फीचा नवा लूक काही मिनिटात व्हायरल झाला आहे.(Urfi Javed New Look video viral Motorbike seat cover netizen comment)

यावेळी उर्फी जावेद जशी कॅमेऱ्यासमोर आली तसं तिला पाहून कुणी म्हणालं की हिनं सोफ्याचे कव्हर काढून अंगावर घातलेय का.. तर कुणी म्हणालं बयेनं मोटरबाईकचं सीट कव्हर काढून अंगावर घातलंय की काय..

उर्फीचा नवा ड्रेस हा म्हणे सोफ्याच्या गाद्या कापून बनवला गेलाय. उर्फीचा हा ड्रेस लाइट ब्राऊन कलरचा आहे. लेदर फोमची गादी दिसतेय ती. अनेकदा मोटरबाईकचे सीट कव्हर असे असतात म्हणून तिनं तेच सीटकव्हर अंगावर घातलंय असं लोकांचे म्हणणे पडतेय.

उर्फीच्या या नव्या लूकविषयी बोलायचं झालं तर तिनं स्कर्ट सोबत क्रॉप टॉप घातला आहे. ब्रालाइन खाली इतका मोठा गोल कट दिला गेलाय की त्यामुळे सगळंच कॅमेऱ्यात कैद झालं आहे. असो पण ज्या बिनधास्त अॅटिट्युडनं ती पोझेस देत आहे यासाठी तिला दाद द्यावी लागेल.

उर्फीच्या या लूकवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत..कुणी तिच्या फॅशन सेन्सची खिल्ली उडवली आहे तर कुणी तिच्या बिनधास्त अॅटिट्युडला दाद दिली आहे.