
Urfi Javed Podcast: ''माझ्यासोबत आणखी वाईट काय घडणार,भीतीच उरली नाही''
उर्फी जावेद(Urfi javed) म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती कमी कपड्यात वावरणारी, आपल्या विचित्र फॅशन स्टाईल्सनी ट्रोलर्सच्या सतत निशाण्यावर असणारी,बिनधास्त जगणारी अभिनेत्री. आज भले तिला कितीही लोकं नाव ठेवत असतील तरी सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ पडला रे पडला की पाहण्यासाठी झुंबड उडवणारे काही कमी नाहीत. अशाच सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदनं पहिल्यांदाच मराठी पॉडकास्टसाठी मुलाखत दिली आहे. उर्फी जशी आपल्याला दिसते त्यापेक्षा प्रत्यक्ष आयुष्यात ती खूप वेगळी. चारचौघांसाऱखीच स्वप्न घेऊन वावरणारी उर्फी इतकी बिनधास्त कशी झाली याविषयी सांगताना तिनं आपल्या आयुष्यातील त्या घडून गेलेल्या वाईट गोष्टींचा उल्लेख केला आहे. नेमकं काय म्हणालीय उर्फी जावेद? त्यासाठी या बातमीत जोडलेली लिंक नक्कीच ऐका.
उर्फी जावेद तशी लखनौची पण आज अनेक वर्ष करीत असलेल्या स्ट्रगलच्या निमित्तानं ती मुंबईत राहतेय. आज उर्फीनं अनेक मालिकांतून छोट्या छोट्या भूमिका केल्या असल्या तरी बिग बॉस ओटीटी मध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्या अतरंगी फॅशन पाहून ती चर्चेत आली. आणि मग काय घराबाहेर आल्यावर तर तिच्या विचित्र फॅशन आयडियाजमनी कळसंच गाठला. पण ती असं का करते,कोण आहे यासाठी तिला पाठिंबा देणारं,तिला अशा विचित्र फॅशन आयडियाज कोण देतं आणि त्यावरनं ट्रोल होण्यावर नेमकं तिला काय वाटतं यावर बिनधास्त उर्फीची विधानं ऐकून कदाचित चक्रावून जाल किंवा तुमच्यापैकी काहीजण भावूकही व्हाल. उर्फीचा फिटनेस मंत्राही हटके आहे. तो देखील तिनं या मुलाखतीत सांगितला आहे. तेव्हा नक्की ऐका उर्फी जावेदची मराठी पॉडकास्टसाठी दिलेली ही मुलाखत. लिंक वरती बातमीत जोडली आहे.
Web Title: Urfi Javed Sakal Podcast
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..