
Urfi Javed: घरातल्या माशांनाही उर्फीनं नाही सोडलं, 'फॅशन' साठी त्यांचा केला वापर!
Urfi Javed social media celebrity new fashion : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फीविषयी जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. उर्फी ही कोणत्याही गोष्टीमुळे चर्चेत येते आणि नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. आता उर्फीनं जी फॅशन केली आहे त्यामुळे ती नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.
उर्फी ही नेहमीच तिच्या अजब फॅशनमुळे बातमीचा विषय असते. उर्फीनं आतापर्यत तिच्या घरातील विविध वस्तूंचा वापर हा फॅशनसाठी कसा करता येतो हे दाखवून दिले आहे. त्यामुळे तिची ती क्रिएटिव्हीटी पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे तर काहींनी तिला ट्रोलही केलं आहे. काही महिन्यांपूर्वी उर्फीच्या वागण्यावरुन तिला राजकीय पक्षाच्या नेत्यांकडूनही समज देण्यात आली होती.
Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका
उर्फी आणि त्या पक्षाच्या महिला नेत्या यांच्यातील वादानं देशाचे लक्ष वेधून घेतले होते. पण ऐकेल ती उर्फी कसली तिनं त्या महिला नेत्याची बोलतीच बंद केली होती. आता उर्फीनं जी फॅशन केली आहे ते पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तिनं घरातील माशांची फॅशन केली आहे. तिच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. यापूर्वी देखील तिनं तिच्या फॅशननं नेटकऱ्यांना, चाहत्यांना चकित केलं आहे.
उर्फी तिच्या फॅशनच्या बाबत नेहमीच प्रयोगशील असल्याचे दिसून येते. कधी प्लॅस्टिकच्या बॅगची फॅशन तर कधी लहान मुलांच्या खेळण्यांचा उपयोग ती फॅशनसाठी करताना दिसून येते. उर्फीनं आता माशांपासूनचा एक आऊटफिट तयार केला असून त्या व्हिडिओनं सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली आहे.
उर्फीनं तो व्हिडिओ शेयर करताना त्याला कॅप्शनही दिली आहे. त्यात ती म्हणते की, बरं झालं ससुराल सिमर का मधल्या सिमरच्या वेळेस मी नव्हते नाहीतर तिचं काही खरं नव्हतं. वाचली ती सिमर...अशा शब्दांत उर्फीनं तिची प्रतिक्रिया दिली आहे. नेटकऱ्यांनी देखील त्या व्हिडिओवर मिश्किल शब्दांत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एकानं म्हटलं आहे की, आता माशा देखील उर्फीला घाबरतील. दुसऱ्यानं म्हटलं आहे की, उर्फीला अशा अवतारात पाहिलं आता माझा दिवस कसा जाणार कुणास ठाऊक...याशिवाय काही नेटकऱ्यांनी उर्फीच्या क्रिएटिव्हीटीचे कौतुक केले आहे. तिला मोठ्या मनानं दाद दिली आहे.