Urfi Javed : 'मला कुणीच घर भाड्यानं देत नाही, जो देईल त्याला...' उर्फीचा मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वी तिनं तर आपण यापुढे वेडीवाकडी फॅशन करुन कुणाचाही राग ओढावून घेणार नाही असे सांगितले होते.
Urfi Javed
Urfi JavedEsakal

Urfi Javed unable to find new house trolled viral community : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी उर्फी जावेद ही आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं तर आपण यापुढे वेडीवाकडी फॅशन करुन कुणाचाही राग ओढावून घेणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा तिनं आपल्या पोस्टवरुन माघार घेतल्याचे दिसून आले. मी तुम्हा सगळ्यांना एप्रिल फुल केल्याचे सांगून चाहत्यांना मोठा धक्का दिल्याचे म्हटले.

आता उर्फीनं तिला मुंबईमध्ये घर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. मी यापूर्वी अनेकदा घर हवं असल्याचे माझ्या सोशल मीडियावरुन कित्येकांना सांगितले आहे. पण मला कुणाकडूनही काहीही प्रतिसाद आलेला नाही. माझा धर्म हा देखील मला घर मिळण्यासाठी आड येत असल्याचे उर्फीचे म्हणणे आहे. मात्र यासगळ्यात नेटकऱ्यांनी तिला तिचे वागणे सुधरवण्याचा सल्ला दिला आहे. तू जशी आहेस त्यात पहिला बदल कर तुला कुठेही घर मिळेल. असे सांगितले आहे.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सोशल मीडियावर उर्फीचा चाहतावर्ग मोठा आहे. काही दिवसांपूर्वी तिचं बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरनं कौतूक केलं होतं. उर्फीची बाजू घेताच उर्फीनं लगेच रणबीर कपूरच्या विरोधात प्रतिक्रिया दिली होती. यापूर्वी उर्फीच्या विरोधात ज्यांनी वक्तव्य केले आहे त्यांना तिनं चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील उर्फीला कपड्यांबाबत इशारा दिला होता. मात्र उर्फीनं तिच्या शैलीत वाघ यांना निरुत्तर केले होते.

Urfi Javed
Viral Video: आम्हालाही मोह आवरता आला नाहीच.. मोस्ट ट्रेंडींग गाण्यावर थीरकले केदार-अंकुश-भरत..

एका मुलाखतीमध्ये उर्फीनं आपल्याला मुंबईमध्ये तिला भाड्यानं घर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. घरासाठी आपण एवढा संघर्ष केला असून अद्याप घर मिळालं नसल्याचे तिचे म्हणणे आहे. कुणीही घर मालक एकट्या मुस्लिम मुलीला घर द्यायला टाळाटाळ करत असल्याचे उर्फीनं सांगितलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी बॉलीवूडमध्ये काम करते हे अनेकांना आवडत नाही. ह्युमन्स ऑफ बॉम्बे ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये उर्फीचे काही खुलासे समोर आले आहेत.

उर्फी म्हणते, मी सध्या एका मोडकळीस आलेल्या वन बीएचकेमध्ये राहते. मला आता त्या घरामध्ये राहायचे नाही. त्यामुळे मी दूसरीकडे घर पाहते आहे. पण मला घरच मिळत नसल्याची खंतही उर्फीनं यावेळी व्यक्त केली आहे. मला अजूनपर्यत घर मिळालेले नाही. त्यामुळे कुणी घर देतं का घरं, या उर्फीला घर हवंय. अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे. असे दिसून आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com