Urmila Kothare: पहिल्या प्रेमाने जखम दिली तर.. या प्रश्नावर उत्तर देत उर्मिलाने साधला करेक्ट निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urmila kanetkar Kothare said If the first love cheated then Find another one

Urmila Kothare: पहिल्या प्रेमाने जखम दिली तर.. या प्रश्नावर उत्तर देत उर्मिलाने साधला करेक्ट निशाणा

Urmila Kanitkar kothare: मराठी मनोरंजन विश्वातील एक देखणी आणि कसदार अभिनय करणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे. गेली अनेक वर्षे ती मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. अभिनेत्री म्हणून ती चर्चेत आहेच पण ती कोठारे घराची म्हणजे महेश कोठारे यांची सून आहे.

गेली काही दिवस तिच्या कामपेक्षा तुझ्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा अधिक आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मराठी चित्रपट विश्वामध्ये आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणारी जोडी म्हणून आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेचे नाव घेतलं जाते.पण गेल्या काही दिवसांपासून या दोघांमधील वाद सगळ्यांसामोर आहे आहेत.

मध्यंतरी त्यांचा घटस्फोट होणार असल्याची आणि ते विभक्त होणार असल्याचेही बोलले जात होते. पण त्याबाबत अधिकृतपणे कुणीही बोलले नाही. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत उर्मिला अगदी सुचकतेने एक वाक्य बोलून गेली..

नुकताच जगभरात महिला दिन साजरा झाला. याच दिनाचे औचित्य साधत यावेळी प्लॅनेट मराठी ओटीटीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉक शोमध्ये उर्मिला कोठारेने हजेरी लावली होती. यावेळी उर्मिला कोठारेनी भरपूर गप्पा मारल्या आणि खूप धमालमस्ती केली. पण एका महत्वाच्या विषयावरही तिने लक्ष वेधले.

या मुलाखतीत उर्मिलाला विचारले गेले की, 'प्रेम म्हणजे काय?' त्यावर उर्मिला म्हणते, 'प्रेम म्हणजे मैत्री आणि विश्वास..' त्यावर उर्मिलाला पुन्हा प्रश्न केला जातो, 'की जर त्याच प्रमाणे तुम्हाला जखम दिली तर?..'

या प्रश्नावर मात्र उर्मिला म्हणते, 'तर.. आपण सरळ दुसरं प्रेम शोधावं..' उर्मीलाच्या या उत्तरावर सगळेच आश्चर्य व्यक्त करतात. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या उत्तराचा नेमका काय अर्थ आहे, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. कारण एरव्ही नात्यांवर सामंजस्याने बोलणारी उर्मिला आज थेट टोकाची भूमिका घेते, याबाबत सर्वांनाच धक्का बसला आहे. या उत्तरामागे उर्मिला आणि आदिनाथ यांच्यातील बिघडलेले संबंध तर नाहीना असेही बोलले जात आहे.

टॅग्स :urmila kanetkar