Urvashi Rautela Pressotherapy: उर्वशीचा नादच नाय! प्रेसोथेरपी करतानाचा फोटो व्हायरल; एका सेशनची किंमत ऐकून व्हाल थक्क

उर्वशीने आता प्रेसोथेरपी घेतली आहे.
Urvashi Rautela
Urvashi Rautela Esakal
Updated on

Urvashi Rautela Pressotherapy: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच तिच्या कामामुळे कमी आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. गेल्या काही काळापासून ती क्रिकेटमुळे चर्चेत आहे. उर्वशी आणि टीम इंडियाचा स्टार विकेट कीपर फलंदाज ऋषभ पंत यांच्यातील वाद तर सर्वांनाच चांगलाच माहित आहे.

मात्र आता उर्वशी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. सध्या उर्वशीचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जे पाहिल्यानंतर ती नेमकं काय करतेय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर तिला काय झाले आहे असा सवाल तिचे चाहते विचारत आहे.

उर्वशीने आता प्रेसोथेरपी घेतली आहे. आपल्या कामाच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत ती आपल्या शरिराची काळजी घेत आहे. तिने स्वत: ला आरामदायी वाटावं यासाठी प्रीसोथेरपी घेतली आहे. आता प्रेसोथेरपी म्हणजे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

प्रेसोथेरपी हा एक उपचार आहे ज्यात शरीराच्या काही भागांवर हवेचा दाब देत थेरपी केली जाते. या थेरपीची मदत डेटॉक्सिफिकेशनसाठी होते.

तिने या थेरपीचे काही फोटो शेयर केले आहेत. ज्यात कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, 'टाइम ऑफ प्रेसोथेरपी. शरीरावर डिटॉक्सिंग करणे, विषारी पदार्थ काढून टाकणं, मजबूत रोगप्रतिकारक शक्ती. ”

आता उर्वशीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हे सेशन खुपच महाग आहे. या थेरपीच्या एका सेशनची किंमत किती आहे हे जाणुन नेटकरी थक्क झाले आहेत.

या थेरपीच्या सेशनसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की ही थेरपी तणावमुक्त राहण्यास, चमक आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केली जाते. ज्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करण्याची शक्ती मिळते. या थेरपीच्या एका सेशनची किंमत सुमारे 60 मिनिटांसाठी 80 हजाराहून अधिक आहे. दरमहा कमीतकमी 2-3 वेळा ही थेरपी घेणे आवश्यक आहे.

उर्वशी राउतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच तेलगू चित्रपट वॉल्टायर व्हेरीया, एजंट, ब्रो आणि स्कंदामध्ये दिसले. लवकरच ती पुन्हा एकदा 'दिल है ग्रे' आणि 'ब्लॅक गुलाब' मध्ये काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com