Usha Mangeshkar Birthday: 'या' गाण्यामुळे उषा मंगेशकर रातोरात स्टार बनल्या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Usha Mangeshkar Birthday this song change her career singer to star

Usha Mangeshkar Birthday: 'या' गाण्यामुळे उषा मंगेशकर रातोरात स्टार बनल्या..

usha mangeshkar: गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांची धाकटी बहीणआणि ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा आज वाढदिवस. आज त्या आपला 87 वा वाढदिवस साजरा करत आहेत. उषा मंगेशकर यांनी गायलेली अनेक भक्तीगीते अजरामर झाली आहेत, पण चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले. पण एक असं गाणं त्यांच्या आयुष्यात आलं की त्यांचं आयुष्य पालटून गेलं.

(Usha Mangeshkar Birthday this song change her career singer to star)

हेही वाचा: Appi Amchi Collector: थेट आकाशात जाऊन प्रपोझ.. मराठी मालिकेत नवा प्रयोग

उषा मंगेशकर यांचा जन्म 15 डिसेंबर 1935 रोजी मध्य प्रदेशात झाला. उषा मंगेशकर यांच्यावर घरातूनच संगीताचे संस्कार झाले. पुढे त्या लता मंगेशकर यांच्या पायावर पाय ठेवत पार्श्वगायनात आल्या. उषा मंगेशकर यांनी हिंदी, मराठी, बंगाली, भोजपुरी, नेपाळी, आसामी आणि कन्नड भाषांमध्ये गाणी गायली आहेत. भक्ती संगीत, लावणी, प्रेमगीते अशा कित्येक प्रकारात त्यांनी गाणी गायली आहेत.

हेही वाचा: Onkar Bhojane: हास्यजत्रा सोडली, फू बाई फू फसलं तरी ओंकार भोजने फॉर्मात.. आता थेट मोठा पडद्यावर..

'छबीदार छबी मी तोऱ्यात उभी', 'एक लाजरा न् साजरा', 'काय बाई सांगू', 'गोड गोजिरी लाल लाजरी', 'शालू हिरवा', अशी अनेक गीते त्यांनी आपल्या मधुर आवाजाने अजरामर केली आहेत. पण 1955 साली आलेल्या 'आजाद' (Azad) सिनेमातील 'अपलम चपलम' या गाण्याने उषा मंगेशकर यांना खरी ओळख मिळाली. आजही हे गाणं रसिकांच्या ओठांवर आहे.

त्यानंतर 1975 साली आलेल्या 'जय संतोषी मां' या सिनेमातील 'मैं तो आरती उतारो रे' हे त्यांचं गाणं प्रचंड गाजलं. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत पण तत्यांनी कधीही साधेपणा सोडला नाही. संगीतासोबत त्या उत्तम चित्रकार आहेत. त्यांची अनेक चित्रे प्रसिद्ध आहेत. त्यांनी वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर व बहीण लता दीदी यांच्या रेखाटलेल्या चित्रांचे विशेष कौतुक झाले.