Jeetendra Birthday: एक मराठी दिग्दर्शक पाठीशी होता म्हणून जितेंद्र होऊ शकले सुपरस्टार..

दुकानदार ते अभिनेता.. जितेंद्र यांच्या वाढदिवशी जाणून घ्या हा खास प्रवास..
v shantaram gives chance to jeetendra and How actor made his debut in Navrang as Sandhya's body double
v shantaram gives chance to jeetendra and How actor made his debut in Navrang as Sandhya's body doublesakal

Jeetendra Birthday: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांचा आज वाढदिवस. जितेंद्र आज ८१ वर्षांचे झाले. आज बॉलीवुडमध्ये एक दिग्गज अभिनेते सुपरस्टार म्हणून जरी त्यांची ओळख असली तरी त्यांच्यातील कौशल्य हेरणारा एक मराठी दिग्दर्शक होता.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक मराठी दिग्दर्शक होता म्हणूनच जितेंद्र यांचं करियर होऊ शकलं. कारण जितेंद्र हे एका व्यापारी कुटुंबातून येतात. त्यांचा जन्म ७ एप्रिल १९४२ रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचं खरं नाव जितेंद्र नसून रवी कपूर असे आहे. त्यांचे वडील व्यापारी होते. जितेंद्र यांनी आपले शिक्षण मुंबईत पूर्ण केले. जशी प्रत्येक यशस्वी व्यक्तीची वाटचालीत संघर्ष येतो तसा जितेंद्र यांनीही संघर्ष अनुभवला. त्याचीच ही गोष्ट..

(v shantaram gives chance to jeetendra and How actor made his debut in Navrang as Sandhya's body double)

v shantaram gives chance to jeetendra and How actor made his debut in Navrang as Sandhya's body double
jeetendra Birthday: 'या'अभिनेत्रीने धुडकावून लावला होता जितेंद्र यांचा लग्नाचा प्रस्ताव.. आणि मग..

जितेंद्र यांची चित्रपट सृष्टीतील सुरुवात ही “फिल्मीच” म्हणावी लागेल. त्यांचे वडील इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करत असत, त्यामुळे चित्रपटांमध्ये लागणारे दागिने ते चित्रपट निर्मात्यांना देत असत.

एकदा जितेंद्र, प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्हि. शांताराम यांच्याकडे दागिने देण्यासाठी गेले असता शांताराम यांच्या लक्षात आले की या मुलामध्ये अभिनय करण्याची प्रचंड क्षमता आहे. मग त्यांनी जितेंद्रला सुप्रसिद्ध अभिनेत्री संध्या यांची नवरंग या चित्रपटामध्ये संध्या यांच्या बॉडी डबलची भूमिका करण्याची संधी दिली.

हा चित्रपट 1959 ला प्रदर्शित करण्यात आला होता. जितेंद्र यांनी या संधीचं सोनं केलं. त्यानंतर, त्यानी कधीही मागे वळून बघितले नाही.

त्यांनी दोनशेहून अधिक हिंदी चित्रपट केलेले आहेत. त्यांनी 80 हुन अधिक दाक्षिणात्य चित्रपट हिंदीमध्ये परत बनवण्याचा विक्रम केलेला आहे, यातील बहुतांशी सिनेमे तेलगू सुपरस्टार कृष्णा यांचे होते. कृष्णा आणि जितेंद्र हे दोघेही चांगले मित्र म्हणून ओळखले जातात.

त्यांचा अभिनय आणि नृत्यातील योगदानामुळे त्यांना 2003 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच त्यांना 2006 मध्ये त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी चित्रगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. आजवर अनेक मोठमोठ्या सन्मानाने जितेंद्र यांना गौरविण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com