'देवमाणूस' मालिकेत होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonali Patil and Kiran Gaikwad

'देवमाणूस' मालिकेत होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री

छोट्या पडद्यावरील बहुचर्चित मालिका 'देवमाणूस'मध्ये Devmanus आता एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. 'वैजू नंबर १' Vaiju No. 1 या मालिकेतील सोनाली पाटील Sonali Patil आता 'देवमाणूस'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. ही मालिका आता अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. भर लग्नमंडपातून अजितला अटक झाल्यानंतर, झालेली नाचक्की आणि अपमान तो सहन करू शकत नाहीये. या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समिकरणं शिजू लागली आहेत. अशा वेळी सोनाली पाटील या मालिकेत वकिलाच्या भूमिकेतून एंट्री करणार आहे. आर्या देशमुख असं तिच्या भूमिकेचं नाव असेल. (Vaiju No 1 fame Sonali Patil to feature in Devmanus soon)

'मी येतेय पुन्हा एका नव्या रुपात..' असं कॅप्शन देत सोनालीने वकिलाच्या भूमिकेतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. आता सोनालीच्या एंट्रीने मालिकेत कोणतं नवं वळण येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हेही वाचा: मराठी मालिकांमध्ये खलनायकी पात्र गाजवणारे कलाकार

मालिकेत रंजक वळण

अजित त्याची केस स्वत:च लढणार असं ठरवतो. दिव्या आणि सरकारी वकील यांना अजितच्या चतुराईची कल्पना येते. डिंपलच्या घरातील सर्वजण अजूनही अजितच्या बाजूने आहेत. समोर येणारे पुरावे पाहून ते देखील संभ्रमात आहेत. आता या मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

हेही वाचा: TRP न मिळाल्याने फ्लॉप झालेल्या मराठी मालिका

Web Title: Vaiju No 1 Fame Sonali Patil To Feature In Devmanus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top