Vaishali Takkar Death: काय होतं वैशालीच्या डायरीत? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaishali Thakkar News

Vaishali Takkar Death: काय होतं वैशालीच्या डायरीत?

Vaishali Thakkar Death News: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्करनं आत्मत्या केल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 29 वर्षाच्या या अभिनेत्रीनं वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. तिनं सुसाईड करण्यापूर्वी एक चिठ्ठीही लिहिली होती. त्यात तिनं ज्या गोष्टींचा खुलासा केला होता तो आता समोर आला आहे. पोलिसांना तपासाच्या दरम्यान वैशालीकडून डायरी मिळाली आहे. त्यातूही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वैशालीची अकाली एक्झिट ही अनेकांसाठी काळाचा आघात करणारी गोष्ट होती. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशालीच्या डायरीत ज्या गोष्टी सापडल्या त्यावरुन तिचा बॉयफ्रेंड हा तिला त्रास देत होता असे दिसून आले होते. तिचा साखरपूडाही झाला होती. मात्र हे रिलेशन फार काळ टिकलं नाही. मित्रांसोबतचे तिचे संबंध हे दिवसेंदिवस खराब होत चालले होते. वैशालीचा मानसिक त्रासही वाढत होता. अशातच वैशालीनं टोकाचं पाऊल उचललं. सध्या या प्रकरणाचा तपास तेजाजी नगर पोलीस करत आहे.

हेही वाचा: Viral Video: हत्तीचा नाद केला, वाघ पळून गेला!

वैशालीनं हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपला मित्र विकास सेठी त्याची पत्नी जान्हवी राणा यांच्याशी चर्चा केली होती. अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. ई टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, वैशालीनं काही दिवसांपूर्वी विकास आणि जान्हवीशी चर्चाही केली होती. त्यावेळी तिनं आपण खरेदीसाठी इंदौरला येणार असल्याचे सांगितले होते. वैशालीच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती येत्या डिसेंबरमध्ये कॅलिफॉर्नियामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरशी होणार होते.

हेही वाचा: Jaya Bachchan: 'एवढा राग येतो तर घरातून बाहेर पडू नका'? नेटकऱ्यांनी जयाजींना सुनावलं

जान्हवीनं सांगितलं की, मी वैशालीला आर्थिक मदतीसाठी एक दिवस फोन केला होता. त्यावेळी तिनं सांगितलं की, ती दिवाळीच्या निमित्तानं मुंबईला येणार आहे. तिनं लग्नाच्या खरेदीचे प्लॅनिंग केलं होतं. आम्ही खूप काही गोष्टी ठरवल्या होत्या. मात्र तसे काही झाले नाही. तिनं जे काही केलं त्याचे खूप वाईट वाटते. तिच्याकडून अशा कृत्याची अपेक्षा नव्हती.

हेही वाचा: Jaya Bachchan: 'लाज कशी वाटत नाही सेल्फी घ्यायला'? जया बच्चन चाहत्यांवर संतापल्या