उद्यापासून दर'रोज डे'; प्रत्येक डे विषयी घ्या जाणून!

शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली की, तरूणांमध्ये उत्सुकता असते ती 14 फेब्रुवारीची म्हणजेच व्हॅलेंटाइन डे या दिवसाची.

व्हॅलेंटाइन डे 2019 : मुंबई- फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली की, तरूणांमध्ये उत्सुकता असते ती 14 फेब्रुवारीची म्हणजेच व्हॅलेंटाइन डे या दिवसाची. 

फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली की, तरूणांमध्ये उत्सुकता असते ती १४ फेब्रुवारीची म्हणजेच व्हॅलेंटाइन डे ची. पण या व्हॅलेंटाइन डे ची सुरूवात एका आठवड्यापूर्वीच होते. लोक आपल्या पार्टनरला फूल, गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात. कुणी पार्टनरला रोमॅंटिक डेटला घेऊन जातं. चला जाणून घेऊ कोणत्या दिवशी कोणता डे साजरा केला जाणार आहे.  

'व्हॅलेंटाइन डे'चा इतिहास
व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याचा इतिहासही फारच रोमांचक आहे. तिसऱ्या शतकात रोममध्ये एक क्लॉडिअस नावाचा राजा होता. हा राजा फारच कठोर होता. त्याचं मत होतं प्रेम आणि लग्न हे मनुष्याला कमजोर करतात. त्याने त्याच्या सैनिकांना लग्न आणि प्रेम न करण्याचा आदेश दिला होता. 

क्लॉडियसच्या राज्यात एक संत होते. त्यांचं नाव होतं व्हॅलेंटाइन. त्यांनी राजाच्या आदेशाला न जुमानता प्रेमाचा प्रसार आणि प्रचार करण्यास सुरूवात केली. इतकेच काय तर काही सैनिकांचं लग्नही करून दिलं. जेव्हा राजाला याची माहिती मिळाली तेव्हा राजाने संत व्हॅलेंटाइनला फाशीची शिक्षा दिली. 14 फेब्रुवारीला त्यांना फाशी देण्यात आली होती. तेव्हापासून हा दिवस प्रेमदिवस म्हणून साजरा केला जातोय. 

व्हॅलेंटाइन डे सप्ताह
07 फेब्रुवारी-रोझ डे

एकमेकांना रोझ म्हणजेच गुलाब किंवा अन्य फुले देऊन रोझ डे साजरा करण्यात येतो. यंदाचा रोझ डे हा उद्या म्हणजेच बुधवारी आहे. खासकरून लाल गुलाब हा आपल्या जोडीदाराला देण्यासाठी वापरला जातो. लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतिक असते.

08 फेब्रुवारी - प्रपोज डे
प्रेमोत्सवाच्या दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. यंदाचा प्रपोज डे हा परवा म्हणजेच गुरुवारी आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीकडे भावना व्यक्त करू शकता. या दिवसाचे हेच महत्त्व आहे.

09 फेब्रुवारी - चॉकलेट डे
प्रेमोत्सवाचा तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. यंदाचा चॉकलेट डे हा शुक्रवारी आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीच्या गोड व्यक्तीला चॉकलेट देऊन त्या व्यक्तीप्रती असलेल्या तुमच्या भावना व्यक्त करू शकता.

10 फेब्रुवारी - टेडी डे
या सप्ताहातील चौथा दिवस म्हणजे टेडी डे. या दिवशी टेडी किंवा भेटवस्तू एकमेकांना दिल्या जातात. ती भेटवस्तू आपल्या जोडीदारासाठी एक छान भेट असते.

11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे
प्रॉमिस डेचे महत्त्व म्हणजे या दिवशी एकमेकांना साथ देण्याचे वचन दिले जाते. त्याचबरोबर ते निभावण्यासाठी एकमेकांना कमिटमेंट दिली जाते. असा हा प्रॉमिस डे यावर्षी रविवारी आहे.

12 फेब्रुवारी - हग डे
प्रेमोत्सवाचा सहावा दिवस म्हणजेच हग डे. हग डेच्या दिवशी, आपल्या जोडीदाराला किंवा आपल्या मित्र मैत्रिणींना मिठी मारा. या वर्षी, हग डे मंगळवारी साजरा केला जाईल.

13 फेब्रुवारी - किस डे
व्हॅलेंटाईन डेच्या आधीचा दिवस, म्हणजेच 13 फेब्रुवारी हा 'किस डे' म्हणून साजरा केला जातो. यंदाचा 'किस डे' बुधवारी येत आहे. प्रेमाचं आणि आपुलकीचं प्रतीक असलेलं 'किस' म्हणजे तुमच्या जोडीदारासाठी एक छान भेटच असते.

14 फेब्रुवारी - व्हॅलेंटाइन डे
आणि आता व्हॅलेटाईनच्या आठवड्यातील सर्वांत महत्त्वाचा दिवस.. 14 फेब्रुवारी! तिसऱ्या शतकातील सेंट व्हॅलेंटाईन हे प्रेमाचे प्रतीक मानले जातात.. यंदाचा व्हॅलेंटाईन डे गुरूवारी साजरा केला जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentine Day List all you need to know day date calendar