Valentine Special : विराट-अनुष्का लहानपणीच पडले होते प्रेमात, खास व्यक्तीने सांगितलं सिक्रेट !

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

व्हॅलेनटाइनला फक्त एक दिवस राहिला आहे आणि या दिवसाची प्रेमीयुगुल वाट पाहत असतात. पण, अनेकांची लव्हस्टोरी म्हणजे बरेच वर्षांच प्रेम असतं. त्यातीलच एक कपल म्हणजे विराट-अनुष्का होय. जाणून घ्या त्यांच्या लव्हस्टोरीची एक खास गोष्ट.

मुंबई : बॉलिवूडमधील कपल्स कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. बॉलिवूडच्या फेवरेट कपल्सपैकी एक आहे विराट आणि अनुष्का ! त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे त्यांच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवरुन समजून येतेच. या कपलने एकत्र फोटो अपलोड केला की तो इंटरनेटवर व्हायरल होतोच. अनुष्का आणि विराट हे चाहत्यांचं फेवरेट कपल आहे. त्यांच्या लव्हस्टोरी विषयी किंवा त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये असते. व्हॅलेनटाइनला फक्त एक दिवस राहिला आहे आणि या दिवसाची प्रेमीयुगुल वाट पाहत असतात. पण, अनेकांची लव्हस्टोरी म्हणजे बरेच वर्षांच प्रेम असतं. त्यातीलच एक कपल म्हणजे विराट-अनुष्का होय. जाणून घ्या त्यांच्या लव्हस्टोरीची एक खास गोष्ट.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Diwali from us to you and your family. I hope we all find the light in us and may truth always triumph. 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघं बराच काळ डेट करत होते. त्यानंतर 11 डिसेंबर 2017 ला दोघं लग्नबंधनात अडकले. कोणालाही माहित पडू न देता त्या दोघांनी इटलीमध्ये लग्न केलं. अनुष्का आणि विराट यांच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले. एका अॅड शुटिंगच्या दरम्यान 2013 ला त्यांची भेट झाली. त्यानंतरच अनुष्का आणि विराट यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. पण, खरंतर अनुष्का आणि विराट एकमेकांना लहानपणापासूनच लाइक करतात. अशी माहिती एका खास आणि जवळच्या व्यक्तीने दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

My partner for lifetime & beyond and my fasting partner for the day  Happy karvachauth to all 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्काची आजी उर्मिला यांनी या सिक्रेटविषयी सांगितले. उत्तराखंड इथे राहणाऱ्या उर्मिला यांनी सांगितले की, '' अनुष्का आणि विराट एकमेकांना आताच नाही तर, लहानपणापासून ओळखत आहेत. अनुष्काचं कुटुंब विराटला आधीपासूनच ओळखते आहे. लहानपणी जेव्हा विराट घरी यायचा तेव्हा अनुष्का त्याच्यासोबत क्रिकेट खेळायची. दोघं एकत्र भरपूर क्रिकेट खेळायचे आणि खरंतर लहानपमीच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अनुष्काचे वडिल सैन्यात अधिकारी होते आणि बंगळूरला असताना विराट आणि अनुष्काचा भाऊ कर्णेष एकत्र खेळत असत. विराट कर्णेशसोबत अनेकदा घरी येत असे.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

You make me such a happy girl 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्का त्यांच्या घरातील सर्वात लहान नात आहे आणि त्यामुळे ती आजी-आजोबांची लाडकी नात आहे. आजीला विराट आवडतच होता आणि म्हणून त्यांच्या नात्याला घरातून कधी केला गेला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

It's heaven, when you don't sense time passing by ... It's heaven, when you marry a good 'man' ... 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्का शर्माने शाहरुख आणि कतरिनासोबत 'झिरो' हा शेवटचा सिनेमा केला. त्यानंतर कोणत्याही सिनेमात दिसली नाही. लवकरच तिचे दोन बायोपिक येणार असल्याची चर्चा आहे. तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहेत वाट पाहत आहेत. अनुष्का आणि विराट सोशल मीडियावर अॅक्टीव असतात. 'नुश' हा अनुष्काचा क्लोथिंग ब्रॅंड आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Valentine Special anushka and virat kohli love each other since childhood