esakal | Valentine Special : मराठीतील या रोमॅंटिक कपल्सचा सोशल मीडियावर बोलबाला !
sakal

बोलून बातमी शोधा

valentine special top romantic couples of Marathi movie industry

बॉलिवूडची अनेक कपल्स चाहत्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये टॉपला आहेत. पण, मराठी सिनेसृष्टीतील जोड्याही कमी नाहीत. चाहत्यांच्या मते काही जोड्या या 'कपल गोल्स' आहेत. जाणून घ्या मराठीतील कोणते आहेत सुंदर कपल्स !

Valentine Special : मराठीतील या रोमॅंटिक कपल्सचा सोशल मीडियावर बोलबाला !

sakal_logo
By
ऋतुजा कदम

मुंबई : आज आहे 14 फेब्रुवारी अर्थात Valentines day ! आजचा दिवस प्रेमयुगुलांसाठी खास आहे. अनेकजण आजच्या दिवशी आवडत्या व्यक्तीला प्रेमाची कबुली देतात. तर, कपल्स जोडीदारासोबत वेळ घालवतात. बॉलिवूडची अनेक कपल्स चाहत्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये टॉपला आहेत. पण, मराठी सिनेसृष्टीतील जोड्याही कमी नाहीत. चाहत्यांच्या मते काही जोड्या या 'कपल गोल्स' आहेत. जाणून घ्या मराठीतील कोणते आहेत सुंदर कपल्स !

शिव-विणा 
शिव ठाकरे आणि विणा जगताप हे सोशल मीडियावरचं फेमस कपल आहे. लोकप्रिय शो 'बिग बॉस मराठी' च्या दुसऱ्या पर्वामध्ये शिव आणि विणा सदस्य होते. शिव या पर्वाचा विजेता ठरला. तिथेच त्यांची ओळख झाली. या मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. अनेकांना असेही वाटले होते की, हे प्रेम फक्त शोपुरते मर्यादीत राहिल. पण, त्या सर्वांना चुकीचं ठरवत बिग बॉसच्या शोनंतरही या दोघांनी त्यांचं प्रेम असल्याचं दाखवून दिलं. ते दोघं सोशल मीडियावर अॅक्टीव असतात. एवढचं काय एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटोही शेअर करत असतात. त्या दोघांचे फोटो चांगलेच व्हायरल होतात. या रोमॅंटिक कपलची फॅनफॉलोइंग जास्त आहे.

सिद्धार्थ-मिताली 
बॉलिवूडमधील अनेक कपल चाहत्यांच्या फेवरेट लिस्टमध्ये अगदी टॉपवर आहेत. असं असलं तरी मराठी सिनेसृष्टीतील कपल्सचीही तितकीच पसंती आहे. त्यामधील एक गोड कपल म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. मराठी इन्डस्ट्रीमधील चॉकलेट बॉय सिद्धार्थ आणि मिताली बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. सिद्धार्थ आणि मिताली डेट करत आहेतच शिवाय हे कपल लग्नदेखील करणार आहेत. मागच्या वर्षी जानेवारीमध्ये त्या दोघांचा साखरपुडा  झाला. त्यामुळे अनेकदा ते दोघं एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. हे फोटो अनेकदा इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होतात.

सुवरत-सखी 
छोट्या पडद्यावरील सुपरहिट ठरलेली मालिका म्हणजे ‘दिल दोस्ती दुनियादारी.’ या मालिकेने चाहत्यांना वेडं केलं. त्याचं दुसरं पर्वही आलं. ही मालिका चाहत्यांच्या मनात घर करुन गेली. या मालिकेतील अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले. सध्या सखी लंडनमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी गेली आहे. त्यामुळे ते दोघे सध्या लॉंग डिस्टंट रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. सोशल मीडियावर दोघंही अॅक्टीव असल्याने एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वीच सखी भारतात आली होती तेव्हा त्या दोघांनी एकसारखे टॅटू काढले. सखी आणि सुव्रतने एप्रिल 2019मध्ये लग्न केले. मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत नेरळ येथील फार्महाऊसवर हा विवाहसोहळा पार पडला.

ऋषी-इशा 
'जय मल्हार' या लोकप्रिय मालिकेतून लाइम लाइटमध्ये आलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर. सध्या ती रिलेशनशिपमध्ये आहे. ऋषी सक्सेनासोबत. ऋषीने 'काहे दिया परदेस' या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेन तो घराघरात पोहोचला. ईशा अभिनेता ऋषी सक्सेनासोबत रिलेशनशिपमध्ये असून या दोघांनीही मागच्याच वर्षी त्यांचं नातं सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑफिशिअल केलं होतं.सध्या ईशा झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनायाची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिचा 'गर्लफ्रेंड' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

अजिंक्य- शिवानी 
शिवानी सुर्वे ही लोकप्रिय शो 'बिग बॉस मराठी' च्या दुसऱ्या पर्वामध्ये सदस्य होती. या शोमधल्या तिच्या गेमला लोकांनी खूप प्रतिसाद दिला. काही कारणाने ती शोमधून बाहेर गेली होती पण, पुन्हा परतली. तिची फॅन फॉलोइंग जास्त आहे. शिवानी अजिंक्य ननावरे या अभिनेत्याला डेट करतेय. अजिंक्य ननावरे अभिनेता असून त्याने शिवानीसोबत 'तू जिवाला गुंतवावे' या मालिकेत काम केलं आहे. या मालिकेच्या चित्रकरणादरम्यानचं दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. गेल्या चार वर्षांपासून शिवानी आणि अजिंक्य रिलेशनशीपमध्ये आहेत. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते.