vani jayaram: 'आधुनिक भारताची मीरा' हरपली... जाणुन घ्या पद्मभूषण वाणी जयराम यांच्या आयूष्यातील 'या' खास गोष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vani jayaram

vani jayaram: 'आधुनिक भारताची मीरा' हरपली... जाणुन घ्या पद्मभूषण वाणी जयराम यांच्या आयूष्यातील 'या' खास गोष्टी

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन झाले. चेन्नईतील नुंगमबक्कम येथील हॅडोस रोडवरील त्याच्या घरी या प्रसिद्ध गायिकेचे निधन झाले आणि त्याच्या कपाळावर जखम झाल्याचंही वृत्त आहे. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण नुकताच जाहीर झाला होता.

वाणी जयराम यांचा 30 नोव्हेंबर 1945 मध्ये वेल्लोर, तामिळनाडू येथे झाला. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका म्हणून वाणी यांना ओळखले जाते . वाणी यांची कारकीर्द 1971 मध्ये सुरू झाली आणि ती चार दशकांहून अधिक काळ पसरली आहे. 1970 च्या दशकापासून ते 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात वाणी अनेकदा भारतातील अनेक संगीतकारांची निवड झाली आहे.

वाणी जयराम संगीतकारांच्या कुटुंबातील होत्या. त्यांना ५ बहिणी आणि तीन भाऊ आहेत. वाणी घरात सर्वात लहान होत्या. वाणी यांनी वयाच्या आठव्या वर्षी मद्रास ऑल इंडिया रेडिओसाठी पहिले गाणे गायले होते. वाणी यांनी तीन वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आणि ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांमधून राज्य सरकारचे पुरस्कारही जिंकले.

वाणी यांनी उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले होते. त्याचे लग्न जयराम यांच्याशी झाले होते. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित गुड्डी या चित्रपटातून वाणी यांना यश मिळाले. देसाईंनी वाणीला या चित्रपटातील तीन गाणी रेकॉर्ड करण्याची ऑफर दिली, ज्यात 'बोले रे पापीहारा' हे गाणे लोकप्रिय झाले.

पंडित रविशंकर यांनी संगीतबद्ध केलेल्या मीरा (1979) मधील "मेरे तो गिरधर गोपाल" या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटासाठी त्यांनी 12 हून अधिक भजने रेकॉर्ड केली जी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. वाणी यांच्या अकस्मित निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, यामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.