नताशा होणार वरुण की दुल्हनिया; 24 जानेवारीला अडकरणार लग्नाच्या बेडीत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

लहानपाणीपासून नताशा आणि वरुण एकमेकांचे मित्र मैत्रीण होते. वरूणने नताशाला एका म्यूझिक कॉन्सर्टमध्ये प्रपोज केले होते. तेव्हा नताशाने वरुणला रिजेक्ट केले होते. त्यानंतर वरुणने अनेकदा नताशाला प्रपोज. अनेकदा रिजेक्ट केल्यानंतर शेवटी नताशाने वरुणला आपला होकार दिला. 

मुंबई : हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, बद्री दुल्हनिया सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंज करणाऱ्या  वरुण धवनला खऱ्या आयुष्यातील दुल्हनिया मिळाली आहे. येत्या २४ जानेवारीला आलिबाग येथे वरूण धवन लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. वरुणची बालमैत्रीण असलेली नताशा दलालसोबत तो लग्न करणार आहे. नताशा ही फॅशन डिझाइनर असून दोघेही खूप वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनीही त्यांचे नातं उघडपणे मीडिया समोर मांडले नव्हते. आता लग्नाची तयारी करताना वरूण आणि नताशा एकत्र दिसत आहे त्यामुळे त्यांच्या नात्याचा खुलासा झाला. 

''स्टुडंट ऑफ द इयर'या चित्रपटातून बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणारा वरूण धवन हा हिंदी चित्रपट सृष्टीतील एक उत्तम अभिनेता म्हणून ओळखला जातो. बदलापूर, जुडवा २, कुली नं १  सारख्या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा तो मुलगा आहे, त्यामुळे अभिनयाचे  धडे त्याला हे घरातूच मिळाले.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

कोण आहे नताशा दलाल?
नताशा दलाल ही एक फॅशन डिझायनर असून तिचा स्वतःचा फॅशन ब्रँड आहे. न्यू यॉर्कला शिक्षण पूर्ण करून २०१३ ला नताशा भारतात परत आली.त्यानंतर नताशा नेहमीच वरुणसोबत दिसत होती. वरुण आणि नताशाची मैत्री लहानपणापासून आहे ते फक्त मित्र मैत्रिण आहेत असा वरुणने त्यावेळी मीडियाला सांगितले होते.

 

मैत्रीचे प्रेमात रूपांतर 
लहानपाणीपासून नताशा आणि वरुण एकमेकांचे मित्र मैत्रीण होते. वरूणने नताशाला एका म्यूझिक कॉन्सर्टमध्ये प्रपोज केले होते. तेव्हा नताशाने वरुणला रिजेक्ट केले होते. त्यानंतर वरुणने अनेकदा नताशाला प्रपोज. अनेकदा रिजेक्ट केल्यानंतर शेवटी नताशाने वरुणला आपला होकार दिला. 

अलिबागला लग्न आणि थायलंडला हनीमून 
वरुण आणि नताशा आपले डेस्टिनेशन वेडींग अलिबाग येथे करणार आहेत. तिथेच लग्न आधीच्या संगीतचा कार्यक्रम होणार आहे. संगीतच्या कार्यक्रमाचे आयोजन कारण जोहर करणार आहे, तसेच आलिया भट, जानव्ही कपूर आणि अर्जुन कापुर हे संगीत कार्यक्रमात स्पेशल डान्स करणार आहेत. शारुख खान, सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, श्रद्धा कपूर हे बॉलीवूड कलाकार वरुण आणि नताशाच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. वरूण आणि नताशा हे हनीमूनला थायलंडला जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Varun Dhawan getting married with Natasha Dalal on 24 January