आपल्यालाच घ्यावं लागणार आई - वडिलांचं पालकत्व, वरुणचं वक्तव्य|Varun Dhawan latest news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhawan Family

आपल्यालाच घ्यावं लागणार आई - वडिलांचं पालकत्व, वरुणचं वक्तव्य

अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) 2022 मध्ये अमर कौशिकच्या (Amar Kaushik) 'भेडिया' (Bhediyaan) आणि राज मेहताचा (Raj Mehta) 'जुग जुग जीयो' (Jug Jug Jeeyo) रिलीज होण्याची वाट पाहत आहे. तो त्याच्या बाकीच्या प्रकल्पांवर काम सुरू करण्यास उत्सुक आहे. पण, सध्याची परिस्थिती पाहता, त्याचं असं म्हणणं आहे की प्रत्येक वेळी आरोग्य आणि सुरक्षितता राखणे हे एक महत्त्वाचे आहे, विशेषत: त्याच्या व्यवसायातील लोकांसाठी ज्यांना केवळ त्यांच्या घरातून बाहेर पडावे लागत नाही तर कॅमेऱ्याला तोंड देताना मास्कशिवाय राहावे लागते.

एक कर्तव्यदक्ष मुलगा म्हणून, अभिनेता त्याची आई लाली (Laali) आणि वडील, चित्रपट निर्माते डेव्हिड धवन (David Dhawan) यांच्यावर लक्ष ठेवून आहे, ज्यामुळे त्याला कोविड सुरक्षा खबरदारीबद्दल आठवण करून देण्याची सवय झाली आहे.

“माझे आई-वडील या परिस्थितीत सर्व नियमांचे पालन करतात, परंतु एक मुलगा म्हणून जेव्हा ते कुठेतरी बाहेर जातात तेव्हा मला काळजी वाटते. त्यांची सतत विचारपूस करणे मी माझे कर्तव्य मानतो. त्यांनी त्यांचे मास्क नीट घातले आहेत का, सॅनिटायझर (Sanitizer) सोबत घेतले आहे का याची खात्री करून घेतो. आजकाल सर्वात मोठे आव्हान म्हणजे तुमच्या पालकांची काळजी घेणे. तुम्ही लहान असताना जसे ते तुमची काळजी घ्याचे त्यांच्याप्रमाणे आता तुम्ही त्यांची घेतली पाहिजे. हा काळ जितका आपल्यासाठी कठीण आहे, त्याहून अधिक आपल्या पालकांसाठी आहे. मी एका सर्व वृद्ध पालकांना सांगू ईच्छितो की जेव्हा गोष्ट सुरक्षिततेची असते तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलांचे ऐकले पाहिजे आणि त्याचे अनुसरण केले पाहिजे.”

Varun Dhawan

Varun Dhawan

वरुण धवनने एक आगामी वेबसीरिज (Webseries) साईन केली आहे. ही वेबसीरिज अँथनी आणि जो रुसो (Anthony Russo-Joseph Russo) यांच्या अमेरिकन ड्रामा सीरिज सिटाडेलची हिंदी रिमेक असेल. आणि आता या ॲक्शन पॅक्ड थ्रिलर वेब सीरिजबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. वरुण धवनसोबत यामध्ये समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन राज निदिमोरू (Raj Nidimoru) आणि कृष्णा डीके (Krishna DK) करणार आहेत. वरुण आणि समांथा एकत्र स्क्रिन शेअर करण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्यामुळे प्रेक्षकांना ही नवी जोडी पाहायला मिळणार हे नक्की. २०२२ मध्ये त्याचे शूटिंग सुरू होणार आहे. ही एक अ‍ॅक्शन पॅक्ड सीरिज असल्याने वरुण आणि समांथा यासाठी बरीच तयारी करावी लागणार आहे. ही नवी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का, हे पाहणे औत्सक्याचे ठरेल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top