esakal | 'आमच्या दुनियेत तुझे स्वागत'; वरूणची 'भेडीया'मध्ये एन्ट्री
sakal

बोलून बातमी शोधा

bhedia varun dhawan

नुकताच जान्हवी कपूरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 'भेडीया' या चित्रपटाच्या ट्रेलरचा आहे.

'आमच्या दुनियेत तुझे स्वागत'; वरूणची 'भेडीया'मध्ये एन्ट्री

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या हॅारर चित्रपटांची संख्या वाढत आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी कपूर, राज कुमार राव आणि वरूण शर्मा यांच्या रूही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरमध्ये 'रूही' या आत्म्याच्या भूमिकेत जान्हवी कपूर दिसत आहे. हॅारर चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद जास्त मिळतो. त्यामुळे रूही चित्रपटाची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. 

नुकताच जान्हवी कपूरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 'भेडीया' या चित्रपटाच्या ट्रेलरचा आहे. या व्हिडीओला 'रूही' आमच्या दुनियेत भेडीयाचे स्वागत करते, 14 एप्रिल 2022 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे'.असे कॅप्शन जान्हवीने या व्हिडीओला दिले आहे. हा व्हिडीओ क्रिती सेनने देखाल सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 'स्त्री आणि रूहीला भेडीयाचा प्रणाम'असे कॅप्शन क्रितीने व्हिडीओला दिले आहे. 

भेडीया चित्रपटाचे मे महिन्यात शूटिंग पूर्ण होईल. या चित्रपटाचे व्हीएफएक्स आणि प्रोस्थेटिक्समध्ये हे उच्चदर्जाचे असतील. अभिनेता अभिषेक बॉनर्जी हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरणं अरूणाचल प्रदेशमध्ये होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. अमर कौशिक यांनी यापुर्वी स्त्री या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. स्त्री ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे स्त्री चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबत काम करायला मिळत असल्याने या चित्रपटातील कलाकरांचा उत्साह आणखी वाढला आहे. वरूण धवन पहिल्यांदाच हॅारर कॉमेडी अससेल्या चित्रपटात काम करणार आहे. त्यामुळे वरूणला या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.