Ved Movie Box Office Collection: फक्त काही तास आणि 50 कोटी! रितेशचा 'वेड' रचणार नवा विक्रम.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ved Movie Box Office Collection earning 48.70 crore in 18 days 50 crore is soon riteish deshmukh genelia D'souza

Ved Movie Box Office Collection: फक्त काही तास आणि 50 कोटी! रितेशचा 'वेड' रचणार नवा विक्रम..

Ved Movie Box Office Collection:   सध्या मनोरंजन विश्वात चर्चा सुरु आहे ती म्हणजे रितेश देशमुखच्या वेड या चित्रपटाची. मराठी मनोरंजन विश्वात या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने जवळपास सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. सलग 18 दिवस या चित्रपटाने तूफान कमाई केली आहे. आता काही तासातच हा चित्रपट 50 कोटी रुपये ही विक्रमी कमाई करणार आहे.

(Ved Movie Box Office Collection earning 48.70 crore in 18 days 50 crore is soon riteish deshmukh genelia D'souza )

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' हा चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे 18 दिवस उलटले असून या चित्रपटाने चांगलीच बाजी मारली. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ आहे की बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरशः जादू केली आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने सोमवारी एका दिवसात 1.04 कोटींची कमाई केली तर 18 दिवसात 48.70 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने एका आठवड्यात 20 कोटी तर 13 दिवसात 40 कोटी कमावले होते.

रितेश आणि जेनिलिया यांची ऑफ स्क्रीन केमिस्ट्री ऑन स्क्रीन ही पाहण्यासाठी चाहते आतुर होते. दोघांचाही फॅनक्लब जबरदस्त मोठा आहे. जेनेलिया चा हा पहिलाच मराठी सिनेमा असल्याने प्रेक्षक अधिकच उत्सुक होते. अखेर ही केमिस्ट्री वर्क झाली असून 'वेड' चित्रपटाने प्रेक्षकांना 'वेड' लावलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. रितेश व जिनिलीयाच्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.