दोन वेण्या, सालस लूक, शाळकरी मुलीच्या भूमिकेत जिनिलिया; 'Besuri' गाणं ऐकून पोरं प्रेमात Ved Movie Song | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ved Movie Song Release,genelia d'souza Deshmukh look cute in besuri song...

Ved Movie Song: दोन वेण्या, सालस लूक, शाळकरी मुलीच्या भूमिकेत जिनिलिया; 'Besuri' गाणं ऐकून पोरं प्रेमात

Ved Movie: रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' सिनेमाच्या गाण्यांनी सध्या सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातलेला दिसत आहेत. सिनेमातील पहिलं गाणं 'वेड तुझा' रिलीज झालं तेव्हा जितकी क्रेझ तरुणाई मध्ये पहायला मिळाली, तेवढाच उत्साह सिनेमातील दुसरं गाणं 'बेसुरी; रिलीज झालं तेव्हा पहायला मिळाला. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या 'वेड' सिनेमाची उत्स्कुता सर्वत्र वाढली आहे . IMDB या साईट वर मोस्ट ऍंटीसिपेटेड फिल्म म्हणून पहिल्या क्रमांकावर फिल्म ट्रेंड होत आहे. (Ved Movie Song Release,genelia d'souza Deshmukh look cute in besuri song...)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: घराबाहेर पडल्यावर रोहित शिंदेची पोस्ट चर्चेत,गर्लफ्रेंड रुचिराला केलं टोटल इग्नोर..

'वेड' च्या निर्मात्यांनी ' बेसुरी' हे गीत आज प्रदर्शित केले आहे . हे गीत वसुंधरा वी यांनी गायले आहे आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे . या गाण्यात रितेश आणि जिनिलिया शाळकरी मुलांच्या लूकमध्ये दिसत आहेत. जिनिलियानं तर काळ्या रिबिनीनं घट्ट बांधलेल्या दोन वेण्यांमध्ये काळीज चोरलं आहे.

तसंही जिनिलियानं आतापर्यंतच्या सर्वच सिनेमातून तिच्या सालस रुपानं अनेकांना घायाळ केलं होतं. आता पुन्हा एकदा जिनिलिया 'वेड' सिनेमातून तो सालस रंग आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येतेय. 'बेसुरी' गाण्याचे सूर जितके मनाला भिडत आहेत तितकंच जिनिलियाचं रुप. रितेशही वयाची पंचेचाळीशी ओलांडली असली तरी शाळकरी मुलाच्या भूमिकेत शोभून दिसला आहे.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

मुंबई फिल्म कंपनीने "देश म्यूजिक“ लेबल द्वारे हे गीत प्रकाशित केले आहे. वेड सिनेमाला अजय अतुलचं संगीत असल्यानं सुरांची मेजवानी असली तर नवल नव्हे. सध्या 'वेड' सिनेमाच्या संगीतावर चाहते भूललेयत अन् सिनेमा रिलीज व्हायची प्रतिक्षा करू लागलेयत एवढं मात्र खरं.