सगळ्यात महागडे गाणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांच्या ‘नमस्ते इंग्लंड’चे चित्रीकरण सुरू झाले आहे. पहिल्यांदा पंजाबमध्ये सुरू असलेले चित्रीकरण आता लंडनमध्ये सुरू आहे. हा एक रोमॅंटिक चित्रपट आहे. त्यामुळे अर्थातच यात अनेक लव्ह साँग्स असणारच. या चित्रपटातील असेच एक गाणे ‘तू मेरी मैं तेरी’साठी चक्क 5.5 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. त्यामुळे हे सगळ्यात महागडे गाणे ठरले आहे. चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकांनीही याला दुजोरा दिला आहे.

मध्यंतरी परिणितीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये अर्जुन आणि परिणिती त्यांच्या चित्रपटाच्या टीमसह बोटीने जात होते. त्यानंतर त्यांचा पाण्यामध्ये एक सीन शूट केला गेला. हे गाणे या चित्रपटाचे सगळ्यात महत्त्वाचे गाणे आहे आणि या गाण्यातच दोघे पंजाब ते लंडनपर्यंतचा प्रवास करतात. यासाठी सिनेकर्त्यांनी या गाण्यासाठी एक इंटरेस्टिंग पाथ ठरवला. या गाण्यात एकूण 18 ते 20 वेगवेगळी लोकेशन्स दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे सगळ्यात महागडे गाणे का ठरलेय ते!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: very costly song in namaste england