मोहम्मद युसूफ खानचा 'दिलीप कुमार' कसा झाला?

dilip kumar
dilip kumar
Summary

सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार आपल्यात राहिले नाहीत. त्यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांनी देशातच नाही तर परदेशातही खूप नाव कमावलं आहे. त्यांचे चित्रपट आणि अभिनय सगळ्यांच्या मनात घर करुन आहे.

सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार आपल्यात राहिले नाहीत. त्यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांनी देशातच नाही तर परदेशातही खूप नाव कमावलं आहे. त्यांचे चित्रपट आणि अभिनय सगळ्यांच्या मनात घर करुन आहे. दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 मध्ये ब्रिटिश भारतातील (आताचे पाकिस्तान) पेशावरमध्ये झाला. त्यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. 65 चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या दिलीप कुमार यांचे नाव बदलण्यामागे एक रंजक गोष्ट आहे. 12 भाऊ-बहिणींसोबत वाढताना त्यांचे आयुष्य सुरुवातीला खडतर राहिले. दिलीप कुमार यांचे वडील आपल्या परिवारासोबत मुंबईमध्ये आले आणि येथेच स्थायिक झाले. (veteran actor Dilip Kumar why changed name Mohammed Yusuf Khan)

मुंबईत आल्यानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. वडिलांशी वाद झाल्याने दिलीप कुमार पुण्यात आले. याठिकाणी त्यांनी एका कॅन्टिंगमध्ये काम सुरु केले. त्यांना महिन्याला 36 रुपये मिळायचे. कुटुंबाच्या आग्रहास्तव ते परत मुंबईत आले. मुंबईमध्ये त्यांच्याकडे कोणतंही काम नव्हतं. यावेळी एका मित्राने कामाच्या संदर्भात त्यांना बॉम्बे टॉकिजच्या मालकिन देविका रानी यांच्याकडे नेलं.

dilip kumar
दिलीप कुमार यांचे टॉप-10 चित्रपट

बॉम्बे टॉकिजच्या मालक देविका रानी यांनी दिलीप कुमार यांना पाहिलं तेव्हा त्या आश्चर्यचकित झाल्या. दिलीप कुमार खूप सुंदर होते आणि त्यांचे व्यक्तीमत्व उठावदार होतं. देविका यांना दिलीप कुमार खूप आवडले. त्यांनी दिलीप कुमार यांना चित्रपटाची ऑफर दिली. पण, दिलीप कुमारच्या वडिलांना आपल्या मुलाने चित्रपटात काम करणे आवडत नव्हते. ते चित्रपटांना नोटंकी म्हणायचे.

dilip kumar
'अभिनयाची संस्था हरपली'; दिलीप कुमार यांच्या निधनाने हळहळलं बॉलिवूड

दिलीप कुमार यांनी आपल्या पुस्तकात (Dilip Kumar: The Substance and the Shadow) लिहिलंय की, ''देविका रानी त्यांना म्हणाल्या, युसूफ मी तुला चित्रपटात लाँच करणार आहे. पण, मला वाटतं की तू स्क्रीन नाव ठेवावं. प्रेक्षकांना अपिल होईल आणि एक रोमँटिक हिरो म्हणून योग्य वाटेल असं तुझं नाव असायला हवं. मला दिलीप कुमार नाव चांगलं वाटतं. तुला या नावाबाबत काय वाटतं.'' दिलीप कुमार यांनाही याची गरज वाटल्याने त्यांनी आपलं नाव बदलण्याचा निर्णय घेतला.

dilip kumar
दिलीप कुमार यांनी पुण्यातील कॅन्टीनमध्ये केलंय काम

ज्वार भाटा या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. ट्रॅजेडी किंग म्हणून दिलीप कुमार प्रसिद्ध आहेत. पण, सुरुवातीच्या अशा चित्रपटांमुळे त्यांना डॉक्टरांची मदत घ्यावी लागली होती. डॉक्टरने त्यांना आनंदी चित्रपट करण्याचा सल्ला दिला होता. दिलीप कुमार आपल्या लग्नामुळेही चर्चेत राहीले. त्यांनी 44 व्या वर्षी 22 वर्षाच्या सायरा बानो यांच्याशी लग्न केले. सायरा बानो शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com