ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना लोटू पाटील नाट्यपुरस्कार 

मधुकर कांबळे
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने दिला जाणारा सोयगाव येथील रंगभुमीचे प्रणेते लोटू पाटील नाट्यपुरस्कार ज्येष्ठ नाट्य, चित्रपट अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे.

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने दिला जाणारा सोयगाव येथील रंगभुमीचे प्रणेते लोटू पाटील नाट्यपुरस्कार ज्येष्ठ नाट्य, चित्रपट अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे.

अजिंठा लेणीच्या जवळ असलेल्या सोयगाव येथे लोटू पाटील यांनी मराठी नाट्यपरंपरा रुजवली त्यांच्या नावाने मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने 2006 पासून रंगभूमीसाठी आयुष्यभर लक्ष्यणीय कामगिरी करणाऱ्या रंगकर्मींना हा पुरस्कार दिला जातो. याबरोबरच भाई संपतराव पवार यांना यशवंतराव चव्हाण विशेष वाड:मय पुरस्कार जाहीर झाला आहे. 

मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी मंगळवारी (ता. 12) या निवडीची घोषणा केली. 12 मार्च ला ख्यातनाम कवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते समारंभपुर्वक हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veteran actor Mohan Agashe won the Lotu Patil Natya award