Sulochana Latkar News: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Veteran actress Sulochana Latkar's condition is critical, admitted to hospital)

Sulochana Latkar News: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात दाखल

Sulochana Latkar Critical Health Update News: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी समोर आलीय.

सुलोचना लाटकर या ९४ वर्षांच्या आहेत. त्यांना उपचारासाठी दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

(Veteran actress Sulochana Latkar's condition is critical, admitted to hospital)

सुलोचना या गेली काही महिने श्वसनाच्या आजाराने त्रस्त आहेत. सुलोचना या श्वसनाशी संबंधित आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर गेले काही महिने शुश्रूषा रुग्णालयात उपचार सुरु होत आहेत.

मार्च मध्ये सुद्धा त्यांना शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी सुलोचना लाटकर यांना मदतीचे आवाहन केले

मार्च मध्ये जेव्हा सुलोचनादीदी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुलोचनादीदींवरील उपचारांचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

याशिवाय उपचारासाठी तीन लाख रुपये रुग्णालयाकडे जमा केले होते. आता नुकत्याच आलेल्या बातमीनुसार सुलोचना दीदी यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

सुलोचनादीदी यांनी आजवर अनेक मराठी सिनेमामध्ये अभिनय केलाय. मराठा तितुका मेळवावा, मोलकरीण, बाळा जो जो रे, सांगते ऐका, सासुरवास, वहिनीच्या बांगड्या अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये

याशिवाय आये दिन बहार के, कटी पतंग, नाटक, चिराग, संबंध अशा हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केलाय. सुलोचना दीदी आजारपणातून लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत.

टॅग्स :Marathi Actress