Veteran Kannada actress Leelavathi passed away at the age of 85
Veteran Kannada actress Leelavathi passed away at the age of 85SAKAL

Leelavathi Passed Away: वयाच्या ८५ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री लीलावथी यांचं निधन

लीलावथी यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झालं
Published on

Leelavathi Passed Away News: तामिळ आणि तेलुगूसह 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्रख्यात कन्नड अभिनेत्री लीलावती यांचं शुक्रवारी संध्याकाळी बेंगळुरू शहराच्या बाहेरील नेलमंगला येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या.

Veteran Kannada actress Leelavathi passed away at the age of 85
Jhimma 2: तिसऱ्या आठवड्यात 'झिम्मा 2'चे शो वाढवले, हेमंत ढोमे आणि 'मराठी पोरीं'चं रॉकींग सेलिब्रेशन

गेल्या अनेक दिवसांपासुन लीलावथी या वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी त्रस्त होत्या. त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

तब्बल 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या लीलावती गेल्या अनेक वर्षांपासून तिचा मुलगा विनोद राजसोबत नेलमंगला येथे राहत होत्या. विनोद सुद्धा एक अभिनेता आहे.

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेलथंगडी येथे लीला किरण म्हणून जन्मलेल्या लीलावती यांना ‘भक्त कुंभरा’, ‘संथा थुकाराम’, ‘भक्त प्रल्हादा’, ‘मांगल्य योग’ आणि 'मन मेच्छिदा मदादी' मधील भूमिकांसाठी ओळखले जाते.

त्यांनी कन्नड मॅटिनी आयडॉल म्हणुन ओळख असलेल्या डॉ. राजकुमार यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com