esakal | अशोकमामा सध्या काय करतायत?
sakal

बोलून बातमी शोधा

Nivedita Ashok Saraf

अशोकमामा सध्या काय करतायत?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

विनोदाचे सम्राट म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अशोक सराफ Ashok Saraf हे सध्या लाइमलाइटपासून दूर आहेत. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. आजही त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. मात्र अशोकमामा सध्या काय करत आहेत, हे फारसं कोणाला माहित नाही. १९६९ सालापासून ते चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम करत आहेत. विनोदी भूमिकांसोबतच इतरही भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. अशोकमामांच्या कॉमेडिच्या टायमिंगचं प्रेक्षकांकडून कौतुक केलं जातं. त्यांनी जवळपास २५०हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

विनोदाचे सम्राट म्हणून ओळखले जाणारे अशोक मामा हे लहानांपासून अगदी थोरांपर्यंत सर्वांचे लाडके अभिनेते आहेत. गेल्या वर्षी त्यांचा 'प्रवास' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत भूमिका साकारली होती. 'सिंघम', 'प्या किया तो डरना क्या', 'गुप्त', 'कोयला', 'येस बॉस', 'जोरु का गुलाम', 'करण अर्जुन' यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. तर 'ये छोटी बडी बातें', 'हम पांच' आणि 'डोंट वरी हो जाएगा' या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

हेही वाचा: अशोक सराफ यांना सायली संजीव का म्हणते 'पप्पा'?

एका रिपोर्टनुसार, अशोक सराफ यांचा २७ वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. या अपघातातून ते थोडक्यात बचावले होते. मात्र त्यांच्या मानेला दुखापत झाली होती. त्यातून बरे होण्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर २०१२ साली पुन्हा एकदा त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. यातूनही ते थोडक्यात बचावले होते. २०११ साली प्रदर्शित झालेल्या 'सिंघम' या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारली आणि त्यानंतर २०२० मध्ये 'प्रवास' या मराठी चित्रपटात ते झळकले.

अशोकमामा हे सध्या लाइमलाइटपासून दूर आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. पत्नी निवेदिता सराफ आणि मुलगा अनिकेत सराफ यांच्यासोबत ते राहतात. अनिकेत हा शेफ आहे. तर निवेदिता सराफ यांनी 'अग्गंबाई सासूबाई' आणि 'अग्गंबाई सूनबाई' या दोन मालिकांमध्ये नुकतंच काम केलं होतं. त्यांच्या दुसऱ्या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.

loading image
go to top