Prabha Atre: आई बरी व्हावी म्हणून प्रभा अत्रेंनी आळवला संगीताचा राग, असा होता संगीतमय प्रवास

आज प्रभा अत्रेंचं पुण्यात वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं
veteran singer dr. Prabha Atre passed away know details her musical journey
veteran singer dr. Prabha Atre passed away know details her musical journey SAKAL
Updated on

Prabha Atre News: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांंचं ९२ व्या वर्षी निधन झालं. प्रभा यांनी त्यांच्या गायनाने गेली अनेक दशकं रसिकांचं मनोरंजन केलं. प्रभा यांच्या निधनाने संगीतविश्वातली तारा निखळला अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

प्रभा यांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाने रसिकांच्या मनावर राज्य केलं असलं तरीही त्यांचा हा प्रवास एका वेगळ्या कारणाने सुरु झाला होता. काय होता तो किस्सा?

veteran singer dr. Prabha Atre passed away know details her musical journey
Kangana Ranaut: बॉयफ्रेंड? कंगनासोबत दिसला मिस्ट्री मॅन, लोकांच्या चर्चांना उधाण, कोण आहे तो?

आईचं आजारपण अन् प्रभा यांच्या गायनाला सुरुवात

प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला. इंदिराबाई अत्रे या त्यांच्या आई. प्रभा आणि त्यांची बहिण उषा यांना संगीतामध्ये रस होता.

वयाच्या ८ व्या वर्षी प्रभा यांची आई इंदिराबाईंची तब्येत बरी नव्हती. त्यावेळी शास्त्रीय संगीताचे धडे घेतल्याने आईला बरं वाटेल, असं प्रभा यांच्या मित्राने त्यांना सांगितलं. त्यामुळे आई आजारपणातून ठणठणीत बरी व्हावी म्हणून प्रभा यांना शास्त्रीय संगीत शिकण्याची प्रेरणा मिळाली.

प्रभा यांचा संगीतमय प्रवास

पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्याकडे 'गुरू-शिष्य' शैलीत त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले.

हिराबाईंकडे शिकत असताना डॉ. अत्रे त्यांना भारताच्या विविध भागांत होणाऱ्या कार्यक्रमांत साथ करत असत. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर संगीतात डॉक्टरेटही केली.

तरुण वयात डॉ. अत्रे यांनी 'संगीत शारदा', 'संगीत विद्याहरण', 'संगीत संशयकल्लोळ', अशा विविध संगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. १९५५ पासून त्यांनी देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करण्यास प्रारंभ केला. भारताच्या व परदेशातील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले.

संगीत मैफिलींसह संगीत अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात देखील डॉ. अत्रे यांनी महत्त्वाचे कार्य केले. भारतात व परदेशात संगीत विषयावर अनेक व्याख्याने त्यांनी दिली. तसेच संगीतावर आधारित विषयांवर विविध संशोधनपर लेख सादर केले. केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार्‍या पद्मविभूषण पुरस्कारासह संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी डॉ. अत्रे यांना गौरवण्यात आले.

veteran singer dr. Prabha Atre passed away know details her musical journey
Merry Christmas - Hanuman: 'मेरी ख्रिसमस' की 'हनुमान'? कोणी मारली पहिल्या दिवशी बॉक्स ऑफीसवर बाजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com