Jolly Bastian: सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या दबंग स्टंटमॅनचा मृत्यू! कारणही आलं समोर

जॉलीने त्याच्या कारकिर्दीत 900 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.
Jolly Bastian dies
Jolly Bastian dies Esakal

Jolly Bastian dies: मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अतिशय प्रसिद्ध फाईट कोरिओग्राफर आणि स्टंटमॅन जॉली बास्टियनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 57 वर्षी जॉलीनं अखेरचा घेतला. जॉलीच्या आकस्मिक निधनाने साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्याच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे.

Jolly Bastian dies
Rubina Dilaik: अखेर रुबीनाने खुलासा केलाच! जुळ्या मुलांचा फोटो शेअर करत नावंही सांगितली

त्याला कन्नड चित्रपटसृष्टीत खास लोकप्रियता मिळाली होती. स्टंटमॅन जॉली बास्टियनच्या आकस्मिक निधनाने साऊथ इंडस्ट्रीची मोठी हानी झाली आहे. जॉली बास्टियनने अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. 'प्रेमलोक' आणि 'मास्टरपीस' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने स्टंट दिग्दर्शक म्हणून काम केले होते.

बाइक मेकॅनिक ते टॉप अॅक्शन कोरिओग्राफर होण्यापर्यंतचा जॉलीचा प्रवास रंजक आणि तितकाच प्रेरणादायी होता. त्याचा जन्म केरळमधील अलेप्पी येथे झाला. तो बंगळुरूमध्ये मोठा झाला. जॉलीने सुरुवातीला मेकॅनिक म्हणून काम केले होते.

तो बाईकवर स्टंट करत असताना एका चित्रपट निर्मात्याने त्याला पाहिले. त्याचा स्टंट पाहून चित्रपट निर्माता खूप प्रभावित झाला. त्याने जॉलीला काम करण्याची संधी दिली. अशाप्रकारे कन्नड चित्रपटसृष्टीत जॉलीने स्टंटमॅन म्हणून प्रवेश केला.

Jolly Bastian dies
Ram Gopal Varma Movie : राम गोपाल वर्मा यांच्या 'Vyooham' वरुन का होतोय वाद? दिग्दर्शकानं केली पोलिसांकडे तक्रार!

जॉलीने वयाच्या 17 व्या वर्षी मनोरंजन विश्वात एंट्री केली. त्याने 'प्रेमलोक' (1987) चित्रपटात अभिनेता रविचंद्रनच्या स्टंट डबलची भूमिका केली होती. अॅक्शन कोरिओग्राफर बनण्यापुर्वी तो एक स्टंटमॅन होता. तो एड्रेनालाईन-पॅकिंग स्टंट करण्यात माहिर होता. महत्वाचं म्हणजे जॉलीने त्याच्या कारकिर्दीत 900 हून अधिक कन्नड, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Jolly Bastian dies
Salman Khan Birthday: 'कुछ कुछ होता है 2' येणार? सलमानच्या वाढदिवशी करण जोहरची घोषणा!

जॉली त्याची क्षमता आणि समर्पणासाठी ओळखला जायचा. एकेकाळी सर्वाधिक मानधन घेणारा अॅक्शन डायरेक्टर म्हणून जॉलीला ओळखले जायचे. त्याने Putnanja, Annaiah, and Shanti Kranti सारख्या चित्रपटांमध्ये छाप सोडत अनेक बेंचमार्क सेट केले. त्याच्या निधनानंतर चाहते आणि कलाकार त्याला श्रद्धांजली वाहत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com